Delhi Crime : आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, मग सर्जिकल ब्लेडने गळा चिरला; दिल्लीत आई-मुलीच्या नात्याला कलंक

प्लान नुसार देवयानीने आई आणि काका दोघांना चहामध्ये घालून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर कार्तिकला फोन करुन बोलावले. कार्तिकने सर्जिकल ब्लेडने देवयानीचा गळा कापला. आईची हत्या केल्यानंतर स्वतः घरातील दागिने आणि रोकड कार्तिककडे दिली आणि त्याला जाण्यास सांगितले.

Delhi Crime : आधी झोपेच्या गोळ्या दिल्या, मग सर्जिकल ब्लेडने गळा चिरला; दिल्लीत आई-मुलीच्या नात्याला कलंक
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:51 PM

दिल्ली : कौटुंबिक वादातून विवाहित मुलीनेच लिव्ह इन पार्टनरच्या मित्रासोबत मिळून स्वतःच्या (Mother)ची गळा चिरुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील आंबेडकर नगरमध्ये शनिवारी काळजाचा ठोका चुकवणारी तसेच आई-मुलीच्या नात्याला कलंक लावणारी ही घटना घडली आहे. सुधा राणी (55) असे मयत दुर्दैवी आईचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. देवयानी आणि कार्तिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदननासाठी पाठवला. (In Delhi, a girl murdered her mother with the help of a friend)

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील आंबेडकर नगरमध्ये एका 55 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळावरुन पुरावे गोळा करण्यात आले. यावेळी मयत सुधा राणी यांची मुलगी देवयानी हिचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी देवयानीने पोलिसांना खोटी कहाणी ऐकवली. रात्री 9.30 च्या सुमारास दोन बंदुकधारी लोक घरात घुसले. त्यांचे चेहरे झाकलेले होते. चोरांनी कपाटातील आईचे दागिने आणि रोख रक्कम घेतली. त्यानंतर आईला मारुन फरार झाले, असे देवयानीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

पोलिसांना मुलीच्या जबाबावर संशय आल्याने पुनः पुन्हा तिची चौकशी केली

मात्र महिलेने मारहाणीला, हत्या करताना कोणताही विरोध केल्याचे मृतदेहाकडे पाहून वाटत नव्हते. पोलिसांना मुलीच्या जबाबावर विरोधाभास दिसला. त्यामुळे पोलिसांनी लगातार तिची चौकशी सुरु ठेवली. अखेर चौकशी दरम्यान तिने सत्य कथन केले. कार्तिक चौहान नामक तरुणाच्या मदतीने आपण आईची गळा चिरुन हत्या केल्याचे तिने कबुल केले.

या कारणाने केली आईची हत्या

देवयानीचा विवाह ग्रेटर नोएडातील चेतन नामक व्यक्तीसोबत झाला होता. दोघांना 4 वर्षाचा मुलगा देखील आहे. मात्र देवयानीने आपल्या पतीला सोडले आणि शिबू नामक तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागली. मात्र देवयानीच्या आईला ही गोष्ट आवडली नव्हती. देवयानीने लिव्ह इन रिलेशनशीप तोडून आपल्या पतीसोबत रहावे, अशी सुधा यांची इच्छा होती. पतीसोबत राहिली नाही तर संपत्तीतून बेदखल करण्याची धमकी सुधा यांनी देवयानीला दिली होती. तसेच देवयानीला पैसेही देणे बंद केले होते. याच रागातून तिने लिव्ह पार्टनर शिबूचा मित्र कार्तिकशी संगनमत करुन आईचा काटा काढला.

प्लान नुसार देवयानीने आई आणि काका दोघांना चहामध्ये घालून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर कार्तिकला फोन करुन बोलावले. कार्तिकने सर्जिकल ब्लेडने देवयानीचा गळा कापला. आईची हत्या केल्यानंतर स्वतः घरातील दागिने आणि रोकड कार्तिककडे दिली आणि त्याला जाण्यास सांगितले. (In Delhi, a girl murdered her mother with the help of a friend)

इतर बातम्या

VIDEO | हळदीला मित्रांचा आग्रह, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच लग्नाच्या मुहूर्तावरच फरार

माझ्या नवऱ्याने गळा चिरला, शेवटच्या श्वासाआधी डॉक्टर महिलेचा जबाब, हत्येचं कारण काय?

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.