माझ्या नवऱ्याने गळा चिरला, शेवटच्या श्वासाआधी डॉक्टर महिलेचा जबाब, हत्येचं कारण काय?

पूनम क्लिनिकच्या केबिनमधून बाहेर आली, तेव्हा तिच्या गळ्यातून रक्त येत होते. सहकारी बसलेल्या खोलीच्या दिशेने ती धावत गेली. त्यानंतर पूनम जखमी अवस्थेतच क्लिनिकमधून बाहेर आली आणि तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीला पकडण्यासाठी तिने स्थानिकांकडे मदत मागितली.

माझ्या नवऱ्याने गळा चिरला, शेवटच्या श्वासाआधी डॉक्टर महिलेचा जबाब, हत्येचं कारण काय?
उत्तर प्रदेशात डॉक्टर महिलेची हत्या
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 1:00 PM

लखनौ : मला नीरजने मारलं… माझ्या नवऱ्याने… दोन चाकू मारले… रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 30 वर्षीय विवाहितेचे हे अखेरचे शब्द होते. अखेरच्या घटका मोजताना पूनमने अंतिम श्वास रोखून धरत पोलिसांना या काही शेवटच्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर काही वेळातच तिने जीव सोडला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये (Bulandshahar Uttar Pradesh) ही खळबळजनक घटना समोर आली आहे. पतीनेच आपला गळा चिरल्याचा आरोप डॉक्टर पत्नीने (Doctor Murder) केला. पतीने तिच्या मानेवर सर्जिकल चाकूने दोन वेळा वार केले. मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने पतीवर सनसनाटी आरोप केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

पूनम देवी असे 30 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. तिचे लग्न नीरज सिंगसोबत पाच वर्षांपूर्वी झाले होते. या दाम्पत्याला तीन वर्षांचा एक मुलगाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती आणि सासरच्या लोकांकडून हुंड्याच्या मागणीमुळे ती वेगळी राहू लागली. महिलेने बुलंदशहरमध्ये क्लिनिक उघडले होते.

नेमकं काय घडलं?

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पूनम क्लिनिकच्या केबिनमधून बाहेर आली, तेव्हा तिच्या शरीरातून रक्त येत होते. सहकारी बसलेल्या खोलीच्या दिशेने ती धावत गेली. पूनम जखमी अवस्थेतच क्लिनिकमधून बाहेर आली आणि तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीला पकडण्यासाठी तिने स्थानिकांकडे मदत मागितली.

स्थानिकांनी नवऱ्याला धरले

घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णवाहिकेच्याही आधी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी पूनमचा मृत्यूपूर्व जबाब एका हवालदाराने नोंदवला. पूनमने आरडाओरडा केल्यामुळे लोकांनी आरोपी पती नीरजला पळून जाण्याआधीच पकडले होते. तिथे उपस्थित लोकांनी पूनमच्या गळ्यावर कापूस ठेवून मानेतून निघणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. यासोबतच गळ्यावर कापडही बांधले होते.

अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करुनही पूनमचा जीव वाचू शकला नाही. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गुलावठी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला

पुण्यातील मटका व्यावसायिकाची साताऱ्यात हत्या, इमारतीच्या छतावर मृतावस्थेत

माय तू वैरीण निघालीस.. प्रियकराच्या मदतीनं आईनंच केला मुलाचा खून, औरंगाबादमधील वैजापूरची घटना

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.