AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi In Mumbai : युद्धनौका देशाला समर्पित करताना पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण, म्हणाले….

PM Modi In Mumbai : आज तीन शक्तीशाली युद्धनौका देशाला समर्पित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला. आज एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन असं तिघांना एकत्र कमिशन केलं गेलं. मोदींच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत हा कार्यक्रम पार पडला.

PM Modi In Mumbai : युद्धनौका देशाला समर्पित करताना पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण, म्हणाले....
PM Modi In Mumbai
| Updated on: Jan 15, 2025 | 11:59 AM
Share

“भारताचा समुद्री वारसा, नौदलाचा गौरवशीला इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आजचा दिवस मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाला नवीन सामर्थ्य, दूरदृष्टी दिलेली आहे. आज त्यांच्या या पावन भूमीवर 21 व्या शतकातील नौदलाला सशक्त करण्यासाठी एक मोठ पाऊल उचलत आहोत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. “हे पहिल्यांदा होतय, जेव्हा एक डिस्ट्रॉयर, फ्रिगेट आणि सबमरीन तिघांना एकत्र कमिशन केल जातय. सर्वात गर्वाची बाब म्हणजे हे तिन्ही फ्रंटलाइन प्लॅटफॉर्म मेड इन इंडिया आहेत” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

“मी भारतीय नौदलाला, निर्माणकार्याशी संबंधित सर्वांना, इंजिनिअर्सना, श्रमिकांना आणि सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. नौदल सुरक्षा जहाज इंडस्ट्रीमध्ये आपला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आज भारत एक मेजर मेरीटाइम पावर बनत आहे. आज जे प्लॅटफॉर्म लॉन्च झालेत, त्यात याची झलक आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सूरत वॉरशीप एका कालखंडाची आठवण

“आपला निलगिरी चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्यासाठी समर्पित आहे. सूरत वॉरशीप एका कालखंडाची आठवण करून देतो. जेव्हा भारत आशियाशी जोडलेला होता. त्याची आठवण देते. काही वर्षापूर्वी मला पहिल्या सबमरीनमध्ये सामील होण्याची संधी मिळाली होती. आता मला या क्लासच्या सहाव्या सबमरीनला कमिशन करण्याची संधी मिळाली आहे. हे दोन्ही प्लॅटफॉर्म भारताची सुरक्षा आणि प्रगतीसाठी सामर्थ्य देईल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपण विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेतून काम करतो

“भारत ग्लोबल साऊथमध्ये जबाबदार सहकारी म्हणून ओळखला जातो. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादच्या भावनेतून काम करत आहे. नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “सागरचा अर्थ सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिजन. आपण सागरच्या व्हिजनने पुढे गेलो. जेव्हा आपण जी २०चं यजमानपद स्वीकारलं. तेव्हा वन अर्थ, वन फ्युचर वन फॅमिलीचा मंत्र आपण दिला. कोरोनाच्या काळात आपण वन अर्थ वन हेल्थ हा मंत्र दिला. आपण संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानतो. आपण सबका साथ सबका विकासचा सिद्धांत पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे या क्षेत्राचं संरक्षण करणं भारत आपलं दायित्व समजतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.