UP Crime : 11 वर्षीपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडात 16 जणांना जन्मठेप; मारेकऱ्यांनी आठ जणांचा घेतला होता जीव

11 जुलै 2011 रोजी ऊस समितीचे माजी अध्यक्ष उदयवीर सिंग, गौरववीर सिंग, समरवीर सिंग, श्यामवीर सिंग, दिव्या, प्रणव, भोला आणि कल्पना अशी एकूण आठ जणांची एकाचवेळी हत्या करण्यात आली होती.

UP Crime : 11 वर्षीपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडात 16 जणांना जन्मठेप; मारेकऱ्यांनी आठ जणांचा घेतला होता जीव
यूपीत 11 वर्षीपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडात 16 जणांना जन्मठेप
Image Credit source: tv9
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 05, 2022 | 2:28 AM

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक हत्याकांड (Murder) प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. 11 वर्षे घडलेल्या या प्रकरणात आठ जणांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या 16 जणांना न्यायालयाने जन्मठेपे (Life Imprisonment)ची शिक्षा सुनावली आहे. तसेच सर्व आरोपींना प्रत्येकी 60 हजार रुपयांचा दंड (Penalty)ही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण 11 जुलै 2011 रोजी घडले होते. नगर कोतवाली परिसरातील बडकाली गावाजवळ ऊस समितीचे माजी अध्यक्ष उदयवीर सिंग यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांची ट्रकने धडक मारून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

पूर्ववैमनस्यातून घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते!

11 जुलै 2011 रोजी ऊस समितीचे माजी अध्यक्ष उदयवीर सिंग, गौरववीर सिंग, समरवीर सिंग, श्यामवीर सिंग, दिव्या, प्रणव, भोला आणि कल्पना अशी एकूण आठ जणांची एकाचवेळी हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून मारेकऱ्यांनी अख्खे कुटुंब संपवले होते. या प्रकरणी पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात माजी ब्लॉक प्रमुख विक्की त्यागी यांची पत्नी मीनू त्यागीसह 16 जणांना न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेसह प्रत्येकी 60 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

एकूण 37 साक्षीदारांनी न्यायालयात दिली साक्ष

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश छोटेलाल यांच्या पोक्सो न्यायालय क्र. 2 मध्ये या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने एडीजी किरण पाल कश्यप यांनी युक्तिवाद केला, तर बचाव पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल जिंदाल यांनी बाजू मांडली. एकूण 37 साक्षीदारांनी न्यायालयात हजेरी राहून साक्ष दिली. त्या आधारे 16 आरोपींचे दोषत्व सिद्ध झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी मीनू त्यागी ही सध्या जिल्हा कारागृहात आहे. ती न्यायालयात हजर न राहिल्याने तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावण्यात आली.

बदकाली रोहणा मार्गावर घडले होते हत्याकांड

2011 मध्ये झालेल्या या घटनेत मृत उदयवीर सिंहचा भाऊ ब्रजवीर सिंह याने 20 जणांची नावे सांगितली होती. हा खटला दीर्घकाळ चालू राहिला. त्यादरम्यान 16 फेब्रुवारी 2015 रोजी न्यायालयाच्या आवारातच विकी त्यागीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपींचा मृत्यू झाला. तसेच एका आरोपीला न्यायालयाने अल्पवयीन घोषित केले होते. अखेर खटला पूर्णत्वास गेला त्यावेळी न्यायालयाने मीनू त्यागीसह ममता, अनिल, शुभम, लोकेश, प्रमोद, मनोज, मोहित, धर्मेंद्र, रवींद्र, विनोद, विदित, बबलू, बॉबी उर्फ ​​विनीत शर्मा, बॉबी उर्फ ​​विनीत त्यागी आणि हरवीर अशा 16 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींनी बदकाली रोहणा मार्गावर गाडीखाली आठ जणांना चिरडून त्यांची हत्या केली होती. (In Uttar Pradesh 16 people were sentenced to life imprisonment in a murder case)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें