वरात निघाली होती, अचानक आला बॉयफ्रेंड, वराच्या कानात काही बोलला, अन् जे घडलं ते….
लग्न मंडपात अक्षता पडल्या आणि मोठ्या धुमधडक्यात लग्नाचा बार उडाला. नववधूने अगदी डोळ्यात आसवं आणत माहेर सोडलं. तिला घेऊन वर आपल्या घराकडे कारने सुसाट निघाला होता, न जे कधीही घडले नाही ते घडले...

लग्नानंतर नववूध सासरी वरासोबत सासरी जात होती. त्याचवेळी रस्त्यात तिचा प्रियकर अचानक बाईक घेऊन आला आणि त्याने गाडी थांबवली. त्याने वराच्या कानात काही सांगितले…त्यानंतर नववधू त्या प्रियकराच्या मोटार सायकलवर पाठी बसली निघाली… आणि तो वर तेथेच वाट पाहात राहीला. अनेक तास उलटूनही त्याची नववधू काही आली नाही. मग तो बिचारा धापा टाकत सासरी पोहचला आणि त्याने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर खऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला…
उत्तर प्रदेशातील गाजीपुर येथे हैराण करणारे प्रकरण उघडकीस आले आहे. येथे लग्न लागल्यानंतर अश्रुभरल्या नयनांनी माहेर सोडून सासरी निघालेली वधू अचानक गायब झाली आहे. नववधू सासरी पती सोबत निघाली होती. इतक्यात रस्त्यात त्यांची गाडी तिच्या प्रियकराने अडविली. त्यानंतर प्रियकराने वराला कोपऱ्यात बोलावले आणि त्याच्या कानात सांगितले की वधूच्या आईची तब्येत अचानक खराब झाली आहे. त्यामुळे वधूला तिच्या आईला भेटणे अत्यंत गरजेचे आहे. आताच तिच्या आईची भेट घडवून वधूला आल्या पावली परत आणून सोडतो असे वचन दिले. वराने देखील कोणतीही मोठ्या विश्वासाने त्याच्या नववधूला जाऊ दिले. आणि मग काय वराचा तेथेच पुतळा झाला. म्हणजे तास् तास् उलटले तरी वधू काही परत आली नाही. अखेर वर त्याच्या सासरी तडक पोहचला. तर तेथे वेगळाच प्रकार ऐकल्याने त्याच्या पायाखालची वाळूच सरकली…
हे प्रकरण बिरनो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडले आहे. नववधू तिच्या प्रियकरासोबत बाईकवरुन पळून गेली आहे. विशेष म्हणजे हा प्रियकर लग्न झालेला असून तीन मुलांचा बाप आहे. या प्रकरणात वधूच्या पित्याने प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. 3 जूनच्या रात्री बिरनो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात वरात निघाली होती. वराच्या आणि वधूच्या पालकांनी विधीवत त्यांचे लग्न लावले. सकाळी वधूला वर आपल्या कारने त्याच्या घरी नेत होता. वधूचे गावातील एका लग्न झालेल्या तरुणासोबत वधूचे प्रेम प्रकरण सुरु होते. याची माहीती वधूच्या घरच्यांनाही होती असे सूत्रांचे म्हणणे आहे.
वराने मांडली कैफीयत…
वराने आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. आपण लग्नात सुमारे 2 लाख रूपयांचे दागिने दिले होते. जे वधूने अंगावर घातले होते. आता ती दागिन्यांसह फरार झाली आहे. या घटनेनंतर वधूच्या पित्याने पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या पोलिस ठाण्याचे बिरनो यांनी सांगितले की तक्रारी नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल.या घटनेची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरु आहे.
