AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात 6 वर्षांची मुलगी ठरली अतिरेकी, लष्कर प्रमुखाच्या हत्येच्या आरोपात झाली अटक

लोकशाही मार्गाने सत्तेत आलेल्या सरकारला हटवून आर्मीने सरकार ताब्यात घेतले आहे. त्यानंतर देशात सिव्हील वॉरसारखी परिस्थिती आहे. विरोध करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना तुरुंगात डांबले जात आहे.

या देशात 6 वर्षांची मुलगी ठरली अतिरेकी, लष्कर प्रमुखाच्या हत्येच्या आरोपात झाली अटक
| Updated on: Jun 06, 2025 | 9:12 PM
Share

आपला शेजारील देश पाकिस्तान अतिरेक्यांचा अड्डा आहे हे आपल्याला अनेक दशकांपासून माहीती आहे. अतिरेक्यांना अटक करताना आता पर्यंत अनेक तरुणांना अटक झाली आहे किंवा कारवाई झाली आहे. परंतू अवघ्या सहा वर्षांची मुलगी जर अतिरेकी ठरवून तिला तुरुंगात डांबले जात असेल तर त्यास काय म्हणाल ? दरवर्षी दहशतवादाचा बळी महिला आणि लहान मुले ठरत असतात. परंतू आता एका लहानग्या मुलीलाच अतिरेकी म्हणून तुरुंगात डांबल्याचे उघडकीस आले आहे.

आपला शेजारील म्यानमार म्हणजेच पूर्वी ब्रह्मदेशात हा विचित्र प्रकार घडला आहे. येथे एका लहान सहा वर्षांच्या मुलीला अतिरेकी ठरवून अटक करण्यात आली आहे. या मुलीवर निवृत्त आर्मी जनरलच्या हत्येत सहभाग घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात म्यानमार लष्कराने या मुलीला आरोपी का केले असा सवाल तुमच्या मनात नक्की असेल. वास्तविक निवृत्ती आर्मी जनरल यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्याची ती मुलगी आहे. मान्यमार आर्मीने एकूण १६ लोकांना अटक केली आहे. २०२१ मध्ये सत्तापलट झाल्यानंतर शेकडो मुलांना अटक करण्यात आली असल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे.

22 मे रोजी यंगून मध्ये 68 वर्षाचे रिटायर्ड ब्रिगेडियर जनरल आणि राजकारणी तुन आंग यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या त्यावेळेस झाली ज्यावेळी ते रस्त्यावर संरक्षणाशिवाय फिरत होते. मान्यमार सैन्याचे मुखपत्र ‘ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार’ मध्ये आलेल्या बातमीनुसार या प्रकरणात एकूण 16 लोकांना अटक झाली आहे. त्यात ही मुलगी देखील आहे. मुख्य आरोपीची ती मुलगी आहे.

या संघटनेने घेतली हत्येची जबाबदारी

गोल्डन व्हॅली वॉरियर्स नावाच्या एका बंडखोर संघटनेने घेतली आहे. ही संघटना आर्मीच्या विरोधात सक्रीय आहे. त्यांचा दावा आहे की चो तुन आंग सातत्याने आर्मीच्या दमनशाही मोहिमाचे समर्थन करत होते. खास करुन सर्वसामान्य नागरिकांना ते त्रास देत होते. त्यासाठी त्यांना लक्ष्य करण्यात आले. मान्यमारच्या आर्मीने या संघटनेला अतिरेकी संघटना म्हणून घोषीत केले आहे.

आर्मीने केला मोठा दावा

म्यानमारच्या सैन्याने आरोप ठेवला आहे की या हत्येच्या मागे निर्वासित सरकारन नॅशनल यूनिटी गव्हर्नमेंटचा ( NUG ) हात आहे. सैन्याने दावा केला आहे की हत्येसाठी 200,000 क्यात ( सुमारे 95 अमेरिकीन डॉलर ) दिले होते. परंतू या नॅशनल यूनिटी गव्हर्नमेंट (NUG) संघटनेने हे आरोप फेटाळून लावले आहे. या संघटनेच्या प्रवक्त्याने आम्ही हत्येचे समर्थन करीत नाह, सैन्याचा हा दावा खोटा आहे.

सत्तापालट झाल्यानंतरची कहानी

2021च्या आर्मीने सरकार उलटवल्यानंतर म्यानमार येथील स्थिती खूपच तणावपूर्ण झाली आहे. सर्व साधारण निवडणूकांनंतर निवडून आलेल्या सरकारला हटवून आर्मीने सरकार ताब्यात घेतले आहे. त्यानंतर देशात सिव्हील वॉर सारखी परिस्थिती आहे. विरोध करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना आणि लहान मुलांना तुरुंगात डांबले जात आहे. एक स्वतंत्र संस्था AAPPच्या मते आतापर्यंत 600 हून अधिक मुलांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 6,700 सर्वसामान्य नागरिकांना ठार केले गेले आहे.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.