सावधान! 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका, कारण काय?

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आता 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात झालीय.

सावधान! 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका, कारण काय?
प्रतिकात्मक फोटो


बंगळुरु : कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे असं वाटण्याइतके कोरोना रुग्ण वाढत आहे. कोरोनाच्या प्रकोपात अनेकांचे जीव जात आहेत. त्यातच आता आणखी एक काळजीत टाकणारी बाब समोर आलीय. यानुसार कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आता 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्येही कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात झालीय. या महिन्यात बंगळुरुत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 472 मुलांना कोरोना संसर्ग झालाय. या आठवड्यात हा आकडा 500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे (Increasing Corona infection in Childrens less than 10 years).

बंगळुरुतील 472 कोरोना बाधित रुग्णांमध्ये 244 मुलं आणि 228 मुलींचा समावेश आहे. तज्ज्ञांनी म्हटलं आहे, “मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या दुसर्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होत आहे. घरातील मोठे लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे घरातील कोरोना संसर्गाचा धोका वाढलाय. त्यातूनच कोरोना रुग्णंची संख्या वाढत आहे.”

“1 वर्षापूर्वी लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण इतकं नव्हतं. कारण तेव्हा लहान मुलं बाहेर जात नव्हती. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संपर्कात न आल्याने कोरोनाची बाधाही मर्यादीत होती. लॉकडाऊन काळात सर्वांच्याच प्रवासावर निर्बंध होते. आता मात्र हे निर्बंध नसल्याने घराबाहेर पार्क, अपार्टमेंट किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास होत आहे. मुलंही खेळायला बाहेर पडत आहेत. त्यामुळे लहान मुलं देखील कोरोना वाहकाचं काम करत आहेत,” असंही मत कर्नाटक टेक्निकल अॅडव्हायझरी कमेटीच्या सदस्यांनी व्यक्त केलंय. तसेच लहान मुलांनी देखील मास्क वापरणं आणि अंतर ठेवणं आवश्यक असल्याचं नमूद केलं.

भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी काय?

भारतात मागील 24 तासात कोविड-19 चे 62,714 नवे रुग्ण आढळले. ही संख्या या वर्षात एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 इतकी झालीय. 2021 मध्ये पहिल्यांदा एक दिवसात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 300 पेक्षा अधिक झालीय.

हेही वाचा :

लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या, राज्य मोदी सरकारकडे मागणी करणार

KDMC Corona Update | कल्याण डोंबिवलीमध्ये शनिवार, रविवारी बंद; जाणून घ्या नवे नियम

व्हिडीओ पाहा :

Increasing Corona infection in Childrens less than 10 years

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI