PM Modi Independence Day 2025 Speech : न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, स्वातंत्र्यदिनी PM मोदींचा पाकिस्तानाला सर्वात मोठा इशारा
PM Modi Independence Day 2025 Speech : "ऑपरेशन सिंदूरच्यावेळी मेड इन इंडिया शस्त्रांची कमाल शत्रूने पाहिली. शत्रुला समजलही नाही, ती कुठली शस्त्र होती. आत्मनिर्भर नसतो, तर ऑपरेशन सिंदूर करु शकलो असतो का?. मेड इन इंडिया शस्त्र सैन्याच्या हातात होती. आमच्या सैन्याने चिंता न करता पराक्रम दाखवला" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला ऑपरेशन सिंदूरच्या शूरवीर सैनिकांना सॅल्यूट करण्याची संधी मिळाली. भारताच्या वीर सौनिकांनी शत्रुला त्याच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा दिली आहे. पहलगामध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकरे धर्म विचारुन लोकांची हत्या केली, पत्नीसमोर पतीला मारलं, मुलांसमोर वडिलांना मारलं. संपूर्ण हिंदुस्थानात आक्रोश होता. संपूर्ण जगाला या घटनेमुळे धक्का बसलेला. माझ्या प्रिय देशवासियानो ऑपरेशन सिंदूर त्या आक्रोशाची अभिव्यक्ती आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या संबोधनात म्हणाले. ते लाल किल्ल्यावरुन 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. “22 तारखेला आम्ही आमच्या सैन्याला खुली सूट दिली. रणनिती ते ठरवतील, लक्ष्य ते ठरवतील, वेळ त्यांनी निवडली आणि आपल्या सैन्याने ते करुन दाखवलं, जे अनेक दशकं झालं नव्हतं” असं पीएम मोदी म्हणाले.
“शत्रूच्या प्रदेशात घुसून त्यांची दहशतवादी हेड क्वार्टस धुळीस मिळवली. दहशतवाद्यांच्या इमारती खंडर बनल्या. पाकिस्तानची झोप उडालेली आहे. पाकिस्तानात झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की, रोज नवनवीन खुलासे होत आहेत. नवीन माहिती समोर येत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “आपला देश अनेक दशकापासून दहशतवाद सहन करत आहे. देशाच्या छातीवर त्यांनी वार केले. यापुढे आम्ही दहशतवादी आणि त्या दहशतवाद्यांच पालन पोषण करणाऱ्यांना, त्यांना ताकद देणाऱ्यांना वेगळं मानणार नाही. ते मानवतेने शत्रु आहेत. त्यांच्यात काही फरक नाही” असं पीएम मोदी म्हणाले.
‘ते लक्ष्य ठरवतील आम्ही अंमलबजावणी करु’
“भारताने ठरवलय न्यूक्लियरच्या धमक्यांना आम्ही सहन करणार नाही. न्यूक्लियर ब्लॅकमेल बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. आता ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. पुढेही जर शत्रुने प्रयत्न सुरु ठेवला, तर आमचं सैन्य ठरवेल, सैन्य ती वेळ, त्यांची पद्धत ठरवतील. ते लक्ष्य ठरवतील त्यानुसर आम्ही त्याची अंमलबजावणी करु. आम्ही सडेतोड उत्तर देणार” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावलं. “माझ्या प्रिय देशवासियानो भारताने ठरवलय आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. देशवासियांना समजलय, सिंधूचा करार किती अन्यायकारक आहे, एकतर्फी आहे. माझ्या देशातील शेतकरी पाण्याशिवाय तहानलेला आहे” असं पीएम मोदी म्हणाले.
‘पाण्यावर अधिकार फक्त आणि फक्त भारताचा’
“हा कसला करार होता. मागच्या सात दशकापासून माझ्या देशातील शेतकऱ्यांच अकल्पनीय नुकसान केलय. आता हिंदुस्थानच्या हक्काच्या पाण्यावर अधिकार फक्त आणि फक्त भारताचा आहे. भारताच्या शेतकऱ्यांचा आहे. भारत अजिबात सध्याच सिंधू कराराच स्वरुप पुढे सहन करणार नाही. शेतकरी हित आणि राष्ट्र हिताच्या दृष्टीने आम्हाला हा करार मंजूर नाही” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
