ट्रेलर आला, पिक्चर अजूनही बाकी… ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींनी 36 तासात काय काय केलं?
भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर "ऑपरेशन सिंधू" नावाचे हवाई हल्ले केले. या कारवाईत अनेक दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली. पंतप्रधान मोदी यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबतची बैठक घेतली आहे.

भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ९ तळं उद्धवस्त करण्यात आल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय जवानांनी बदला घेतला. यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. भारताचे हे ऑपरेशन इथेच थांबणार नाही. लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ते सुरूच राहणार आहे, असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ मंगळवारी रात्री १ च्या सुमारास सुरु झाले. त्यानंतर साधारण २५ मिनिटे हे ऑपरेशन सुरु होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले. भारताची ही कारवाई केवळ एक ट्रेलर असून, खरा पिक्चर अजून बाकी आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली. सध्या ऑपरेशन सिंदूरमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनला ३६ तासांहून अधिक काळ लोटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपेरेशनच्या वेळेपासूनच सक्रिय आहेत. ते स्वतः या लष्करी कारवाईवर लक्ष ठेवून होते.
अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानतंर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS) बैठक घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जागतिक अंतराळ अन्वेषण परिषदेला संबोधित केले. भारताची अंतराळ यात्रा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर एकत्रितपणे उंची गाठण्यासाठी आहे. भारत लवकरच एक विशेष जी-२० उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
मोदींची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी बैठकीदरम्यान पाकिस्तानविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशनची माहिती आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असेही त्यांना सांगितले. भारतीय लष्कराने तयारीनुसार कोणतीही चूक न करता ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराची खूप प्रशंसा केली.
यानंतर बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी राष्ट्रपतींना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या मोदी हे पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. ते सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतले. त्यानंतर २३ एप्रिल रोजी सीसीएसची बैठक घेऊन पाकिस्तानवर कठोर निर्णय घेतले.
लष्कराला पूर्ण सूट
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू जल करार रद्द केला होता. यासोबत, राजकीय संबंधांमध्ये कपात केली आणि पाकिस्तानसोबतचा व्यापारही बंद केला. पंतप्रधान मोदी एकीकडे ही कारवाई करत असताना दुसरीकडे बैठकांवर बैठका पार पडत होत्या. या बैठकीत मोदी व्यस्त होते. ते सतत लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होते. यावेळी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. पंतप्रधान मोदींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.