अंतराळातही भारत आणि रशियाच्या मैत्रीचे निशाण, या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा सामंजस्य करार रशियाला आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्यानंतर नवीन भागीदारी असणार आहे. तर भारताला अमेरिका - चीनच्या दरम्यान संतुलन बनवण्यासाठी मदत मिळणार आहे. साल २०३० च्या दशकात अंतराळात रशिया-भारतीय कॉरिडॉर बनणार आहे.

अंतराळातही भारत आणि रशियाच्या मैत्रीचे निशाण, या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करणार
india and russia
| Updated on: Dec 07, 2025 | 4:29 PM

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा (ISS)  प्रवास साल २०३०-३१ पर्यंत समाप्त होणार आहे. यानंतर रशिया आणि भारताने भविष्यातील त्यांच्या अंतराळ स्थानकांना एकाच कक्षेत स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा रशियाच्या अंतराळ एजन्सी रोस्कोस्मोसचे प्रमुख दमित्री बकानोव्ह यांनी दिल्ली दौऱ्याच्या वेळी केली आहे. ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या सोबत दिल्लीला आले होते.

ही दोन्ही अंतराळ स्थानके ५१.६ डिग्री तिरप्या कक्षेत ( inclinaton orbit ) प्रदक्षिणा घालणार आहे. ही तिच कक्षा आहे ज्यात आता ISS फिरत आहे. यामुळे दोन्ही देशांचे अंतराळवीर एकमेकांच्या अंतराळ स्थानकात सहज जाऊ शकणार असून वैज्ञानिक प्रयोग आणि आपात्कालिन स्थितीत एकमेकांची मदत घेऊ शकणार आहेत.

बकानोव्ह यांनी सांगितले की या निर्णयाचा दोन्ही देशांना लाभ होणार आहे. याआधी रशिया त्यांच्या रशियन ऑर्बिटल स्थानकासाठी (ROS) ९६ डिग्री तिरप्या कक्षेचा विचार करत होता. परंतू आता ५१.६ डिग्रीवर सहमती बनली आहे.

काय आहे नवा करार ?

रशियाचे अंतराळ स्थानक ROS रशियन स्पेश सेंटर एनर्जियाद्वारे विकसित होणार आहे. हे स्थानक खोल अंतराळात अंतराळ यान तयार करणे आणि लाँच करण्याचा आधार बनणार आहे. याचा मॉड्युलर डिझाईन यास प्रदीर्घकाळ काम करण्यासाठी लायक बनवणार आहे.

भारताचा BAS अंतराळ यान भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) साल २०३५ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यास स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षी २०४७ च्या आधी चंद्रयान – ३ च्या यशानंतर घोषीत केले आहे.

एकच कक्षा का ?

५१.६ डिग्री तिरपी कक्षा ISS सारखी आहे, जी पृथ्वीला ५१.६ डिग्री उत्तर – दक्षिण अक्षांशाला कव्हर करत आहे. या रशियाच्या सोयूज रॉकेट आणि भारताच्या गगनयान मिशन सहज डॉकिंग कर शकतील

आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढेल

रशियाची न्यूज साईट प्रावदाच्या अनुसार रशियाचे पहिले उप-पंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांनी म्हटले होते ती आम्ही समानांतर मार्गावर चालत आहोत. रशियन ROS साठी ५१.६ डिग्री तिरपी कक्षा निश्चित झाली आहे.भारत देखील त्याच्या स्थानकासाठी हाच विचार करत आहे. बकानोव्ह यांनी इजवेस्टीयाला दिलेल्या मुलाखती सांगितले की सहकार्याच्या क्षेत्रात इंजिन निर्मिती, मानवी उड्डाणे, प्रशिक्षण, रॉकेट इंधन आणि राष्ट्रीय स्थानकांचा विकास यांचा समावेश आहे.

केव्हापर्यंत तयार होतील ?

रशियाच्या अंतराळ स्थानक ROS चे पहिले वैज्ञानिक आणि पॉवर मॉड्युल २०२८ मध्ये लाँच होईल, उर्वरित चार मुख्य मॉड्युल साल २०३० पर्यंत तयार होतील. २०३१-३३ मध्ये अतिरिक्त मॉड्युल जोडले जातील. ख्रुचिनेव्ह सेंटरला तीन मॉड्युलसाठी अंगारा – -A5M रॉकेट ऑर्डर केले आहेत.

भारताचे अंतराळ स्थानक BAS ची निर्मिती इस्रोने साल २०३५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अलिकडेच स्पेडेक्स सॅटेलाईट डॉकिंगच्या यशानंतर भारत हे तंत्रज्ञान मिळवणारा चौथा ( रशिया, अमेरिका, चीन ) देश बनला आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS चा शेवट –

साल २०३०-३१ मध्ये भारत आणि रशिया आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS पासून वेगळे होतील रशियाने आधीच घोषणा केली आहे की ISS साठी तो अमेरिकेच्या सोबत असणार नाही.

रशिया आणि भारताचे जुने नाते

भारताने त्याचा पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियाच्या मदतीने लाँच केला होता. चंद्रयान-२ मध्येही रशियाने मदत केली होती. गगनयान मिशनसाठी भारतीय अंतराळवीरांनी रशियात प्रशिक्षण घेतले आहे.पुतिन यांचा दौरा ब्रिक्स समीट नंतर झाला आहे. जेथे दोन्ही नेत्यांनी अंतराळ सहकार्यावर चर्चा केली आहे. बकानोव्ह यांनी स्पष्ट केले आहे की रशिया त्यांचे तंत्रज्ञान भारतासोबत शेअर करणार आहे.