
मोठी बातमी समोर येत आहे, जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न हे द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जाणार, कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही असं भारतानं अमेरिकेला ठणकावून सांगितलं आहे. आज परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये भारतानं काश्मीरबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काश्मीरच्या मुद्द्यावर इतरांच्या मध्यस्थीची गरज नाही, आम्हाला इतरांची मध्यस्थी मान्य नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींमध्ये चर्चा झाली. जम्मू काश्मीरमधील प्रश्न द्विपक्षीय चर्चेनेच सोडवले जातील, पाकिस्तानने पीओके खाली करावं, असं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली. भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले, तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला, भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला, पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, भारतानं प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला होता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर अमेरिकेकडून व्यापारासंदर्भात देखील भाष्य करण्यात आलं होतं.
याबाबत देखील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भारत आणि अमेरिकेच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, युद्धविरामामध्ये कुठेही व्यापाराचा मुद्दा नव्हता असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील पाकिस्तानकडून युद्धविरामाचं उल्लंघन करण्यात आलं यावरून देखील पाकिस्तानला इशारा देण्यात आला आहे. पाकच्या गोळीचं उत्तर गोळीनंच देऊ, भारताने पाकमधील तळांना टार्गेट केलं. १० मे रोजी पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त केले. एअर बेस नेस्तनाबूत झाल्यावर पाक नमला. पराभव झाला तरी ढोल वाजवणं ही पाकिस्तानची जुनीच सवय आहे, असं पराराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.