American tariff : भारताचा अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, मोठी बातमी समोर

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे, मात्र आता मोठी बातमी समोर येत असून, भारतानं टॅरिफ दबावात देखील मोठा निर्णय घेतला आहे.

American tariff : भारताचा अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं, मोठी बातमी समोर
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2025 | 8:56 PM

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा सांगितलं आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिक आहे. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात म्हणून अजूनही रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू असल्याचा दावा देखील ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे, तसेच भारतानं आता रशियाकडून तेलाची खरेदी कमी केली आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करणार नाही असं आश्वासन आपल्याला देण्यात आलं आहे, अशा प्रकारचे अनेक दावे देखील ट्रम्प यांनी अनेकदा जागतिक मंचावरून केले आहे. मात्र आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे तोंडावर पडले आहेत. भारतानं ट्रम्प यांना जोरदार झटका दिला आहे.

अमेरिकेनं टाकलेल्या दबावानंतर देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. विशेष म्हणजे आता तर भारतानं रशियाकडून तेलाच्या खरेदीच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी भारत रशियाकडून खरेदी करत असलेल्या तेलाच्या खरेदीचं प्रमाण हे 1.855 मिलियन बॅरल प्रतिदिन वर पोहोचलं आहे. हे तेल खरेदीचं प्रमाण ऑक्टोबरच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या पाच महिन्यांमधील कच्च्या तेलाची ही रेकॉर्ड ब्रेक खरेदी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये म्हणून टॅरिफ लावला आहे, मात्र भारतानं आपले ऊर्जा क्षेत्र मजबूत करण्यास प्राथमिकता दिल्याचं यामधून दिसून येत आहे. हा ट्रम्प यांच्यासाठी भारताचा मोठा धक्का मानला जात आहे.

तिसरा सर्वात मोठा खरेदीदार देश

भारत हा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. चीन रशियाकडून कच्च्या तेलाची सर्वाधिक खरेदी करतो. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी सध्या भारताला विविध आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत, त्यामुळे भारतानं देखील रशियाकडून आता कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे, तसेच अमेरिकेच्या टॅरिफचा भारताच्या निर्यातीवर देखील कोणताही परिणा झालेला नसल्याचं दिसून येत आहे.