अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ अत्यंत मोठा हल्ला, नॅशनल गार्ड्सवर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट…
अमेरिकेत मोठी खळबळजनक घटना घडली आहे. थेट व्हाईट हाऊसपासून हाकेच्या अंतरावर मोठा हल्ला झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य या हल्ल्यानंतर केले असून अमेरिकेत स्थिती गंभीर आहे.

अमेरिकेत मोठी खळबळ उडाली असून चक्क व्हाईट हाऊसपासून हाकेच्या अंतरावर मोठा गोळीबार झाला. दोन नॅशनल गार्ड सैनिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. दोन्ही सैनिक देशाची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये तैनात असलेल्या वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डचे सदस्य होते. या घटनेने अमेरिकेतील तणाव पुढे आला असून परिस्थिती तणावात असल्याची माहिती मिळतंय. एफबीआयचे संचालक काश पटेल आणि वॉशिंग्टनच्या महापौर म्युरियल बाऊसर यांनी सांगितले की, गार्ड सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. वेस्ट व्हर्जिनियाच्या गव्हर्नरने दोन्ही सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते, परंतु नंतर त्यांनी त्यांचे विधान मागे घेत म्हटले की त्यांच्या कार्यालयाला त्यांच्या प्रकृतीबद्दल विसंगत अहवाल मिळत आहे.
दोन्ही नॅशनल गार्ड सैनिकांवर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही गोळीबारावर निवेदन दिले आणि म्हटले की, नॅशनल गार्डवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला सोडले जाणार नाही. या गोळीबाराच्या घटनेनंतर सरकारने गंभीर पाऊले उचलली आहेत. ट्रम्प यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चाैकशी केली जात आहे. हेच नाही तर हल्लेखोरालाही गोळी लागल्याची माहिती आहे. परंतु त्याची दुखापत गंभीर नसल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले की, सध्या ताब्यात असलेल्या एका व्यक्तीशिवाय इतर कोणताही संशयित नाही. ताब्यात असलेला व्यक्तीच आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संशयित हल्लेखोर तपासकर्त्यांना सहकार्य करत नाही आणि अटकेच्या वेळी त्याची ओळख पटलेली नव्हती. एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी याला संघीय अधिकाऱ्यांवरील हल्ला म्हटले आहे. मात्र, या घटनेमुळे अमेरिकेतील तणाव वाढला आहे. नॅशनल गार्ड सैनिकांचा मुद्दा अमेरिकेत गाजत असतानाच हा मोठा हल्ला करण्यात आला आहे. आता काय कठोर पाऊले अमेरिकेकडून उचलली जातात, याकडे जगाच्या नजरा आहेत.
