AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा चिनाब ब्रिज पाकिस्तानच नव्हे तर चीनसाठीही टेन्शन, दहशतवादी करु शकणार नाही पीर पंजालमधून घुसखोरी

chenab bridge: भारताच्या काश्मीर खोऱ्यातील विविध योजनांमुळे पाकिस्तान आणि चीन टेन्शनमध्ये आले आहेत. चिनार ब्रिजमुळे दहशतवादाला आळा घालण्यासाठी काउंटर टेरर प्लॅनिंग करणे सोपे होणार आहे.

भारताचा चिनाब ब्रिज पाकिस्तानच नव्हे तर चीनसाठीही टेन्शन, दहशतवादी करु शकणार नाही पीर पंजालमधून घुसखोरी
Narendra ModiImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 06, 2025 | 12:41 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते 46 हजार कोटी रुपयांच्या योजनांची सुरुवात करणार आहेत. तसेच जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिज आणि भारताचा पहिला केबल-स्टे रेल ब्रिज अंजी ब्रिजचे लोकार्पण करणार आहे. तसेच उधमपूर-श्रीनगर-बारामूल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) परियोजना आणि जम्मू-श्रीनगर रेल्वे लाइनचे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या या योजनांमुळे पाकिस्तान आणि चीन टेन्शनमध्ये आले आहेत. हे संपूर्ण प्रकरण हिमालयातील पीर पंजाल पर्वतरांगाभोवती केंद्रित आहे, ज्याला मोदींचे चिनाब चक्रव्यूह म्हटले जात आहे.

पीर पंजाल दर्रा हिमालयाचा विस्तार आहे. हा भाग काश्मीर खोऱ्यास मुगल रोडच्या माध्यमातून राजौरी आणि पुंछ भागाला जोडतो. 3,490 मीटरवर मुगल रोडचा सर्वात उंच पाईंट आहे. काश्मीर खोऱ्याच्या दक्षिण-पश्चिम भागात हा भाग आहे. पीर पंजाल दर्राच्या सर्वात जवळचे शहर शोपिया आहे. त्या ठिकाणी पहलगाम हल्ला झाला होता. याला लागून असलेली बैसरन खोऱ्यातील जंगलसुद्धा पीर पंजालला जोडले गेले आहे.

आयएसआयचे नेटवर्क तुटणार

चिनार ब्रिजमुळे पीर पंजाल क्षेत्रात पाकिस्तानच्या लश्कर, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांबरोबर आयएसआयचे नेटवर्कही तुटणार आहे. या पीर पंजाल भागातून दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करतात. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी या भागातील जंगलांमध्ये फरार झाले होते. आता हे शक्य होणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर टेन्शनमध्ये आले आहे. पाकिस्तानबरोबर चीनसाठी भारताचा हा पूल टेन्शन असणार आहे.

चिनाब पूल भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हा पूल निर्माण करण्यासाठी IIT आणि DRDO ची मदत झाली. या पुलामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. या भागाचा आर्थिक विकास होणार आहे. तसेच सामाजिक विकासाबरोबर पर्यटनासही चालना मिळणार आहे. चिनाब पुलामुळे कोणत्याही ऋतूत भारतीय सैन्य एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकणार आहे. जम्मू-काश्मीरबरोबर लडाखमध्ये सैन्य तैनातीसाठी मदत होणार आहे.

चिनार ब्रिजमुळे दहशतवादाला आळा घालण्यासाठी काउंटर टेरर प्लॅनिंग करणे सोपे होईल. हिमालयातील पीर पंजाल रांगेत घुसखोरीला आळा घालता येणार आहे. खोऱ्यात प्रवेश करणाऱ्या दहशतवाद्यांवर आणि दहशतवादी घटनांवर पायबंद घालता येणार आहे. आपणास जलदगतीने सैन्य पाठवता येणार आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.