कोरोना संकटकाळात काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींना पत्र, सर्वपक्षीय बैठकीसह 6 महत्वाच्या सूचना

देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आणि संसदेच्या स्थायी समित्यांची एक बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी खर्गे यांनी आपल्या पत्रातून केली आहे.

कोरोना संकटकाळात काँग्रेस नेत्याचं पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींना पत्र, सर्वपक्षीय बैठकीसह 6 महत्वाच्या सूचना
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 8:31 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येसह मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आणि संसदेच्या स्थायी समित्यांची एक बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी खर्गे यांनी आपल्या पत्रातून केली आहे. (Congress leader Mallikarjun Kharge’s letter to PM Narendra Modi and Vice President)

खर्गे यांच्या महत्वाच्या सूचना

खर्गे यांनी कोरोना संकटातून वाचण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना काही महत्वाच्या सूचनाही केल्या आहे. त्यात प्रामुख्याने देशातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील 35 हजार कोटी रुपयांचा उपयोग करा. सोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाची (मनरेगा) सीमा 200 दिवसांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

त्याचबरोबर मदत निधी आणि यंत्रणेच्या वितरणात गती आणण्याची सूचना केली आहे. सोबतच लसींचं उत्पादन वाढवणं, महत्वपूर्ण मेडिकल उपकरण व्हॅक्सिनवर 5 टक्के, पीपीई किटवर 5 ते 12 टक्के, रुग्णावाहिकेवर 28 टक्के आणि ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरवर 12 टक्के कर हटवण्याची मागणीही खर्गे यांनी केली आहे.

सोनिया गांधींचंही पंतप्रधानांना पत्र

शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक आणि संसदेच्या आरोग्य समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. सोनिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. लसीकरणासाठी वयाची अट न घालता गरज ओळखून या मोहिमेचा विस्तार केला जावा, अशी प्रमुख मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केलीय. तसंच राज्यातील संसर्गाचा धोका ओळखून त्यांना लसीचा पुरवठा केला जावा. तसंच अन्य कंपन्यांच्या लसींचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

संबंधित बातम्या : 

गडकरींकडे जबाबदारी देण्याचा सल्ला मानला असता तर कोरोना नियंत्रणात असता, स्वामींचा पुन्हा केंद्रावर निशाणा

राजस्थानात खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होणार, राजस्थान सरकारचा मोठा निर्णय

Congress leader Mallikarjun Kharge’s letter to PM Narendra Modi and Vice President

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.