Operation Sindoor : 1 फोटो आणि 1 ओळीने जगाला संदेश…जयशंकर यांची पाकच्या जिव्हारी लागणारी पोस्ट
Operation Sindoor : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फक्त एक फोटो आणि एका ओळीद्वारे जगाला मोठा संदेश दिला आहे. त्यांनी पाकिस्तानच्या जिव्हारी लागेल असं एक वक्तव्य केलं आहे. यातून एक मोठा संदेश दिला आहे.

ऑपरेशन सिंदूरमुळे एकाबाजूला भारतात आनंद आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानात शोक आहे. भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राइक करुन खळबळ उडवून दिली आहे. 7 मे 2025 रोजी मध्यरात्री भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन पाकिस्तान आणि POK मध्ये 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताच्या या कारवाईत किती पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले, त्याचे वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. भारताने या हल्ल्याद्वारे एकप्रकारे पहलगाम अटॅकच्या बदल्याची कारवाई सुरु केली आहे. ऑपरेशन सिंदूरवर एस जयशंकर यांनी एक फोटो आणि एका ओळीद्वारे जगाला कठोर संदेश दिला आहे. जयशंकर यांची ही एक ओळ पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारी आहे.
एस जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. एक फोटो आणि एक ओळ जयशंकर यांनी लिहिली आहे. त्यातून खूप मोठा संदेश दिला आहे. ‘जगाने दहशतवाद अजिबात खपवून घेऊ नये’ हॅशटॅग ऑपरेशन सिंदूर असं जयशंकर यांनी लिहिलं आहे. हा स्ट्राइक पाकिस्तानात झालाय. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला पुरस्कृत करतो, हा संदेश सुद्धा त्यातून गेला आहे. जयशंकर यांनी या ऑपरेशद्वारे दहशतवादाविरोधात जागतिक एकजूटतेची मागणी केली आहे.
The world must show zero tolerance for terrorism. #OperationSindoor pic.twitter.com/dmcCLfbMjN
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 7, 2025
कुठे-कुठे स्ट्राइक झाला?
या कारवाईमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, लष्कर कॅम्प सवाई, बिलाल कॅम्प, कोटली, बरनाल कॅम्प, सरजाल कॅम्प, मेहमूना कॅम्प येथील तळ उडवण्यात आले आहेत. हे तिन्ही सैन्य दलांच मिळून जॉइंट ऑपरेशन होतं. भारतीय सैन्य, एअर फोर्स आणि नौदल तिघांनी मिळून ही Action घेतली आहे. या कारवाईत भारतात निरपराधांचा बळी घेणाऱ्या लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या ठिकाणांना उद्धवस्त केलय. स्वत: पीएम मोदी यांनी या ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलं होतं. त्यांनीच सैन्याला हे नाव सुचवलं होतं. पहलगाममध्ये पत्नीसमोर पतीच नाव आणि धर्म विचारुन हत्या केली होती. हा 26 निरपराधांच्या हत्येचा बदला आहे.
