AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा नेपाळला मोठा दणका, बालेन शाह बॅकफूटवर, नेपाळ सरकारची थेट विनवणी..

बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान झाल्यापासून सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आले आहेत. परंतु आता त्यांचे सूर नरमल्याचं दिसून येत आहे. सातत्याने भारविरोधी भूमिका घेणाऱ्या नेपाळ सरकारने आता थेट भारताला विनंती केली आहे.

भारताचा नेपाळला मोठा दणका, बालेन शाह बॅकफूटवर, नेपाळ सरकारची थेट विनवणी..
balen shahImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 03, 2026 | 7:14 PM
Share

नेपाळमध्ये जेन झीचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर देशात सत्ता परिवर्तन झालं, बालेन शाह यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ते नेपाळचे नवे पंतप्रधान झाले. मात्र बालेन शाह पंतप्रधान होताच त्यांनी भारतविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारत आणि नेपाळमधील संबंध चांगलेच ताणले गेले होते. बालेन शाह यांच्याकडून लेपू लेखवर दावा करण्यात आला होता, एवढंच नाही तर नेपाळ भारतामधून आयात करत असलेल्या वस्तूंवर देखील नेपाळ सरकारने टॅक्स लावला होता. याचा मोठा फटका हा दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात राहणार्‍या नागरिकांना बसल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर भारतातून नेपाळमध्ये जाणाऱ्या वाहनांवर टोला लावण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यानंतर भारताने देखील नेपाळला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती, भारताने पुढील तीन वर्षांसाठी नेपाळला साखर निर्यात करण्यावर बंदी घातली आहे, तसेच नेपाळमधून भारतात आयात होणाऱ्या चहावर कडक तपासणी निर्बंध लादण्यात आल्याने नेपाळला त्याचा मोठा फटका बसला होता.

चहाची निर्यात होत नसल्याने नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात चहा पावडरचं उत्पादन वाढल्याने देशातील काही मोठे कारखाने बंद ठेवण्याची वेळ नेपाळवर आली होती. तसेच साखरेची निर्यात होत नसल्याने आता नेपाळमध्ये साखरेचा देखील तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान भारताने नेपाळमधून भारतात येणार्‍या नागरिकांच्या तपासणीचे तसेच ओळखपत्राचे नियम देखील कडक बनवल्यामुळे नेपाळला त्याचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान बालेन शाह सरकारकडून आता भारताला अशी विनंती करण्यात आली आहे की, भारताने नेपाळचं राष्ट्रीय ओळखपत्र असलेल्या नॅशनल आयडेंटिटी कार्ड (NID) ला सीमापार प्रवासाठी एक वैध कागदपत्र म्हणून परवानगी द्यावी. यामुळे दोन्ही देशांमधील लोकांचं येणं जाणं अधिक सुलभ होईल, तसेच नागरिकाची ओळख पटवनं देखील, सोपं होईल असं नेपाळ सरकारच्या वतीने म्हटलं आहे. ज्या प्रमाणे भारतामध्ये आधार कार्ड वापरलं जातं, त्याच प्रमाणे   नॅशनल आयडेंटिटी कार्डचा वापर नेपाळमध्ये होतो. यामध्ये संबंधित व्यक्तीची सर्व डिजिटल माहिती असते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी