भारतावर युद्धाचे सावट, देशभरात आज मॉक ड्रील, महाराष्ट्राची स्थिती काय?

देशभरातील युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून हे मॉक ड्रिल होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसह तब्बल १६ शहरांमध्ये हे मॉक ड्रील आयोजित करण्यात आले आहे.

भारतावर युद्धाचे सावट, देशभरात आज मॉक ड्रील, महाराष्ट्राची स्थिती काय?
mock drill
| Updated on: May 07, 2025 | 7:04 AM

पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकिस्तानात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज 7 मे बुधवार रोजी राज्यात ठिकठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. देशभरातील युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून हे मॉक ड्रिल होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक यांसह तब्बल १६ शहरांमध्ये हे मॉक ड्रील आयोजित करण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज अनेक राज्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा, मॉल, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईसह एकूण 16 शहरांमध्ये ही मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे. जर भारतात हल्ल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी आणि प्रशासनाने कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा, यासाठी गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या १६ शहरात मॉक ड्रिल होणार आहे.

महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये आज मॉक ड्रिल:

  • मुंबई
  • उरण-जेएनपीटी
  • तारापूर
  • पुणे
  • ठाणे
  • नाशिक
  • थळ-वायशेत
  • रोहा-धाटाव-नागोठाणे
  • मनमाड
  • सिन्नर
  • पिंपरी-चिंचवड
  • संभाजीनगर
  • भुसावळ
  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग

या ठिकाणी युद्धाच्या परिस्थितीत काय करावे, यासाठीच्या कार्यवाहीचे मॉक ड्रिल होणार आहे. या मॉक ड्रिलमुळे आपत्कालीन परिस्थितीत अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज होण्यास मदत होणार आहे.

सायरन वाजल्यावर काय करालं?

  • तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जालं.
  • 5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.
  • सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.
  • फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा.
  • घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा.
  • टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
  • अफवावर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा.

सायरन कुठे-कुठे लागणार?

  • सरकारी भवन
  • प्रशासनिक भवन
  • पोलीस मुख्यालय
  • फायर स्टेशन
  • सैन्य ठिकाणं
  • शहरातील मोठे बाजार
  • गर्दीच्या जागा

सिविल मॉक ड्रिलमध्ये कोण-कोण?

  • जिल्हाधिकारी
  • स्थानीय प्रशासन
  • सिविल डिफेंस वार्डन
  • पोलिसकर्मी
  • होम गार्ड्स
  • कॉलेज-स्कूल विद्यार्थी
  • नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)
  • नॅशनल सर्विस स्कीम (NSS)
  • नेहरू युवा केंद्र संगठन (NYKS)