
भारत-पाकिस्तानात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने मागच्या दोन दिवसात भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी भारताने त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला आहे. त्यांच्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्ताने पुन्हा एकदा भारतातील जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. तसेच काही ठिकाणी गोळीबारही करण्यात आला. यानतंर आता भारताकडूनही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताने लाहोर, कराची, इस्लामपूर, सियालकोट, बहावलपूरमध्ये हल्ला केला आहे. लाहोर शहरातील डिफेन्स सिस्टीम भारताने खाक केली आहे. या हल्ल्यांनंतर लाहोरमध्ये तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. भारतीय सैन्य हे पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक इराद्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारत पाकिस्ता युद्धाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तानमधील या संघर्षाच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा.
सध्या सीमेवर शांतता आहे. श्रीनगर, पठाणकोटसह अनेक शहरांमधील ब्लॅकआउट हटवला आहे. वीजपुरवठा सुरू झाला आहे. लाल चौकात कोणताही स्फोट झालेला नाही आणि ड्रोनचा कोणताही अवशेष सापडलेला नाही, असे सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचं अतिक्रमण अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तानने परिस्थितीला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकनं सामंजस्य कराराचं उल्लंघन केलं. भारतीय सैन्याला या विरोधात कडक पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.
जोरदार तणावनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही काही तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. मात्र यानंतरही चीनने पाकिस्तानला पाठींबा जाहीर केला आहे.
एलओसीवर सध्या गोळीबार होत नाहीय. श्रीनगरमध्ये कोणताही स्फोट झाला नाही. तसेच ब्लॅकआउटही झाला नाही. ड्रोनशी संबंधित माहिती काही वेळानंतर दिली जाईल, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.
पाकिस्तानने युद्धविरामानंतरही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाकिस्तानच्या कुरापती युद्धविरामानंतरही सुरुच आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हीसीद्वारे चर्चा सुरु आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झालं आहे.
गुजरातमधील कच्छमधील हरामिनालाजवळ ड्रोन दिसल्यानंतर एजन्सी सतर्क झाल्या आहेत. जखौजवळ पाकिस्तानी ड्रोन देखील दिसला आहे. प्रत्युत्तरादाखल लष्करानेही 8 राउंड गोळ्या झाडल्या.
राजस्थानमधील बारमेरमध्ये पुन्हा सायरन वाजू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने बाजारपेठेतील दुकाने तात्काळ बंद करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, तात्काळ ब्लॅकआउट करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. शहरात पोलिस प्रशासनाची सक्रियता वाढली आहे.
युद्धबंदीच्या सुमारे 4 तासांच्या आत पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. पठाणकोटसह अनेक भागात पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले आहेत, जे भारतीय सैन्याने हवेतच उद्ध्वस्त केले आहेत. ड्रोन हल्ल्यानंतर जम्मू, सांबा आणि आरएस पुरामध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले आहे.
युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. पठाणकोटमध्ये ड्रोन दिसले त्यानंतर सायरन वाजू लागले. यासोबतच जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट घोषित करण्यात आले आहे.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्याला योग्य उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाला योग्य उत्तर देण्यास सरकारने बीएसएफला सांगितले आहे.
युद्धबंदीच्या 48 तासांच्या आत पाकिस्तानने युद्धबंदीचा भंग केला आहे. भारत सरकारने बीएसएफला योग्य उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. पंजाबमधील पठाणकोटमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काही काळापूर्वी पठाणकोटच्या आसपास पाकिस्तानी ड्रोन दिसले, त्यानंतर पठाणकोट आणि गुरुदासपूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आले. तथापि, कोणत्याही स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा भारताचा विजय आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार जो काही निर्णय घेईल तो योग्यच असेल… हा निश्चितच भारताचा विजय आहे, ज्याने आपल्या शत्रूंशी खूप चांगल्या प्रकारे सामना केला आहे.
पाकिस्तानकडून वारंवार चुकीची माहिती पसरवण्यात आली असल्याचं आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या पत्रकारपरिषदेत सांगण्यात आलं. तसेच भारताने कोणत्याही धार्मिकस्थळाला लक्ष्य केलं नसल्याचंही भारतीय तिन्ही दलाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे.
गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. हवाई दल, नौदल आणि भूदलाकडून युद्धविराम करण्यात आलेला आहे. तिन्ही दलाकडून लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम करण्यात आला आहे.
NSA अजित डोवाल पंतप्रधानांच्या भेटीला गेले आहेत. अजित डोवाल पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. युद्धविरामाबाबत डोवाल मोदींना सर्व माहिती देणार आहेत. एकंदरीत भारत आणि पाकिस्तानमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी भारताने आपल्या अटींवर युद्धविराम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात आता एकमत झालेलं आहे, अशी माहिती एस जयशंकर यांनी दिलेली आहे. लष्करी कारवाई थांबवण्यावर सामंजस्य करार झाला आहे. तेसच दहशतवादाविरोधात आता भारत कुठलीही तडजोड करणार नसल्याचंही एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा युद्धविराम घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मीसी यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता याबाबत दोन्ही देशांची 12 तारखेला डीजीएमओमध्ये चर्चा होणार आहे. आज दुपारी 3.35 मिनिटांनी पाकच्या डीजीएमओंनी भारताच्या डीजीएमओंना फोन केल्याचंही म्हटलं जात आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा युद्धविराम घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मीसी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबईत उद्यापासून फटाके फोडण्यास आणि रॉकेट उडवण्यास बंदी आहे. सीमेवर वाढता तणाव आणि भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मे ते 9 जूनपर्यंत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आदेशाचं पालन न केल्यास कारवाई करणार असल्याचंही म्हटलं आहे.
इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. इस्लामाबादमध्ये पेट्रोल पंप बंद करण्यात आलं आहे. पाकिस्तानात पेट्रोलची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
पाकच्या हल्ल्यात जम्मू-काश्मिरच्या राजौरीच्या अतिरिक्त उपजिल्हाधिकारी राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे. राजकुमार थापा हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी थांबले होते. पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या माऱ्यात थापा यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाकच्या हल्ल्याला भारतीय लष्करानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराकडून अधिकृत व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे.
हरियाणातील सिरसामध्ये रात्रीच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिले जाणार अशी आता भारत सरकारची भूमिका असल्याचं समोर आलं आहे. दहशतवादाविरोधात भारत सरकारने आता मोठं पाऊल उचललं आहे.
दिल्ली एअरपोर्टवर येणारी 30 आणि जाणारी 30 अशी एकूण 60 विमानं रद्द करण्यात आली आहे. देशातंर्गत विमान सेवेला त्यामुळे फटका बसला. पण आंतरराष्ट्रीय विमान सेवावर या निर्णयाचा प्रभाव दिसून आला नाही.
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचे अजून एक ड्रोन हाणून पाडण्यात आले. भारतीय सैन्याने नौशेरा भागात हे ड्रोन नष्ट केले. पाककडून गेल्या तिसऱ्या दिवशी सलग हल्ला चढवण्यात आला आहे.
राजस्थानमधील जैसलमेर येथील नागरिकांसाठी अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. येथील रेल्वे स्टेशन सुद्धा बंद करण्यात आले आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या 75 वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नापाक लोकांनी या देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. जे नापाक होते, ते बाहेर गेले तर ज्यांना हा देश प्रिय होता, ते इथेच राहिले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिल्ली सचिवालयातील सर्व विभागप्रमुखांच बैठक बोलावली. आपत्कालीन स्थिती सर्व विभागाच्या तयारीची त्यांनी समीक्षा केली.
हैदराबाद येथील सैन्य छावणीजवळ फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त सी व्ही आनंद यांनी जनतेला सार्वजनिक ठिकाण, सभा, कार्यक्रमात फटाके फोडू नये असे आवाहन केले आहे.
होशियारपूरमधील टांडाजवळील एका गावात, सीकरी येथे ड्रोन दुर्घटनाग्रस्त झाले. स्थानिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पाकिस्तानविरोधात भारताने जोरदार प्रत्युतर दिले आहे. त्यानंतर आज सौदी अरबचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी एस जयशंकर आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्याशी फोनवर संपर्क साधला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे 14 मे पर्यंत सर्व हज विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
पाकमधील रहिम यार खान एअरबेस उडवला गेला. त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात या एअरबेसचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. धावपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताला जबाबदारीचे भान असल्याचे ठणकावले आज सकाळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.
भारताने हल्ले थांबावावे आणि पाकिस्तान पण माघारी फिरेल, असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केले. त्यामुळे पाकिस्तानची भाषा नरमल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य सीमा रेषेकडे कूच करत असल्याचे समोर आले आहे.
26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा लष्कर कमांडर अबु जुंदाल ठार झाला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या कारवाईत तो ठार झाला.
7 मे रोजी भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकमध्ये मोठे दहशतवादी ठार… युसूफ अझहर, मुदस्सर खान, हाफीज जमील ठार… 7 मेच्या भारतीय हल्ल्यात टॉप – 5 दहशतवादी ठार
पाकिस्तानची हवाई हद्द गेल्या 12 तासांपासून बंद आहे… पाकिस्तानच्या हवाई हद्दीत एकही प्रवासी विमान नाही… पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा…
पाकिस्तानने हल्ला करणे थांबवावं… असं इशारा अमृतसरचे खासदार गुरजीत औजला यांनी दिला आहे. आर्मी त्यांनं त्यांचं भाषेत उत्तर देणार फक्त अमृतसरच नाही तर देशाला पाकिस्तान टारगेट करतोय… आधी ते ड्रग्स विकायचे आता ते ड्रोन बॉम्ब विकतायत… आम्ही त्यांना सोडणार नाही… असं वक्तव्य गुरजीत औजला यांनी केलं आहे.
पाकिस्तानने डागलेली मिसाईल भारतीय एयर डिफेन्स सिस्टमने हवेतच निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला… या मिसाईलचे तुकडे सध्या गावात दोन किलोमीटर दूर पर्यंत पसरले आहेत… आर्मीच्या एका तुकडीने हे सगळे तुकडे घटनास्थळी जाऊन ताब्यात घेतले आहेत, याची माहिती गोळा केलीये… सकाळी ४.३० वाजता भटोडा गावात हा स्फोट झालाय…
सीमेवरील गोळीबार आणि हल्ला थांबवण्यात यावा पंजाबचे कैबिनेट मंत्री कुलदीप धालीवाल यांचा इशारा… पंजाब सरकारकडून अमृतसर भागात पाहणी दौरा सुरु… पाकिस्तानचे दात तोडल्याशिवाय राहणार नाही…
पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे मात्र आता भारत थांबणार नाही… राज्यात आम्ही बैठक घेतली सर्व आम्ही सक्षम आहे… असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
श्रीनगर विमानतळाजवळ पाकचा ड्रोन पाडला… भारतीय लष्काराने पाकचा ड्रोन पाडला आहे. तर जम्मूमध्ये पुन्हा सायरन वाजला आहे.
पाकिस्तानला तुर्कस्तानकडून ड्रोन पुरवले जात आहेत. तुर्कस्तानवर कारवाई करण्याची गरज आहे त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे. जे देश पाकिस्तानला मदत करत आहेत त्यांच्यावर पर्यटकांनी बहिष्कार घातला पाहिजे. पाकिस्तान आता इंटरनॅशनल बॉर्डरवर देखील फायर करत आहे. सर्वाधिक हिंसा एलओसीवर होत आहे चीन पाकिस्तानला मदत करतोय चीनला धडा शिकवण्याती गरज आहे… असं देखील संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन म्हणाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या चारधाम यात्रेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे केदारनाथ धामला जाणारी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे.
पाकिस्तानमधील स्थानिक लोकांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ भारताकडून पाकिस्तानात झालेल्या नुकसानीच्या पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे जमिनीत मोठे खड्डे दिसत आहेत. पाकिस्तानी सैन्य आता हे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यात व्यस्त आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने एक मोठे सुरक्षा पाऊल उचलले आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळे तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानने फतेह-1 क्षेपणास्त्र डागले आहे. रेडिओ पाकिस्ताननुसार, पाकिस्तानने ऑपरेशन बुनयान अल मरसूस सुरु केला आहे. हे नाव कुरानमधील एका आयतमधून घेतले आहे. त्याचा अर्थ मजबूत भिंत असा होता.
भारतीय लष्कराने म्हटले पत्रकार परिषदेत म्हटले की, पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान पुढच्या भागात सैन्य तैनात करत आहे.
पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने पाकिस्तानचे सहा एअरबेस उद्ध्वस्त केली आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पाकिस्तानने भारतातील नागरी वस्ती आणि लष्करी तळांना लक्ष्य करुन हल्ले केले. ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या साह्याने शाळा आणि वैद्यकीय सेंटरला लक्ष केले, असे कर्नल कुरैशी यांनी म्हटले.
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने जोरदार उत्तर दिले आहे. भारत संयम बाळगू इच्छितो. परंतु त्यासाठी पाकिस्तानने संयम ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा भारत जोरदार प्रत्युत्तर देणार आहे, असे कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.
पाकिस्तानने सीमेवर हवाई हल्ले केले. भारतीय हवाई तळांवर हल्ले केले. पंजाबच्या एअर बेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानच्या मुरीद चकवाल, सोरकोट आणि नूर खान हवाई तळाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की भारताने त्यांच्या लढाऊ विमानांमधून या हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आज पुन्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. ते पंतप्रधान मोदींशी भेट घेतील. तसेच थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य पत्रकार परिषद घेणार आहे.
जम्मूमधील कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरावरही पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. अमृतसर आणि जालंधरसह पंजाबमधील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये इंधन संकट निर्माण झाले आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे दर गगणाला भिडले आहे. यामुळे पुढील ४८ तासांसाठी इस्लामाबादमधील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानने भारतीय शहरांवर हल्ले करण्याबाबतचे पुरावे जमा करण्याचे काम सुरु आहे. राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात पाकिस्तानी क्षेपणास्त्राचे अवशेष मिळाले आहे.
VIDEO | India-Pakistan tensions: Debris of weapon was found in Jaisalmer district, Rajasthan.
(Disclaimer: Deferred Visuals by unspecified time)#IndiaPakistanTensions #IndiaPakistanWar #IndiaPakistanWar2025 pic.twitter.com/00h6XycWmI
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2025
लाहोरमध्ये सकाळपासून ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरूच. लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रातही मोठा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्या भारताकडून चोख प्रत्युत्तर, परराष्ट्र मंत्रालयाची 10.30 वाजता पत्रकार परिषद असून सद्यपरिस्थितीची माहिती देण्यात येणार आहे.
एस-400 सिस्टीम नष्ट झाल्याचे किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त निराधार आणि खोटं आहे, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख संरक्षण मंत्रालयात पोहोचले असून लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता संरक्षण मंत्रालय हे परराष्ट्र मंत्रालयासोबत सद्यपरिस्थितीबद्दल माहिती देणार आहे.
अमृतसरमधील वडाळा भाटीवडे गावात ड्रोन पाडलं. घरावर ड्रोन पडल्यामुळे घराच्या परिसरात आग लागली.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानचं लाँचपॅड उद्ध्वस्त. याच लाँचपॅडवरून भारतात ड्रोन हल्ले केले जात होते, मात्र आता भारतीय लष्कराने त्या लाँचपॅडवररच हल्ला करत ते उद्ध्वस्त केलंय.
जम्मू सेक्टरमधील बीएसएफ चौक्यांवरही पाकिस्तानकडून गोळीबार केला आहे. भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सच्या चौक्या आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे.
अमृतसरच्या मुगलानी कोट गावात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे अवशेष सापडले. काल अमृतसर शहरावर हल्ला करण्याचा करण्यात आला प्रयत्न. मात्र ते मिसाइल भारताने पाडलं
हरियाणातील सिरसामध्ये रात्रीच्या सुमारास स्फोट झाला होता, त्यानंतर सिरसा येथे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन, AIIMS भुवनेश्वरने सुट्ट्या आणि स्टेशन रजा यासह सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्याची घोषणा केली आहे.
भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इमर्जन्सी बैठक बोलावली आहे. पाकिस्तानच्या तीन एअर बेसना भारताने लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरी येथे एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पोस्ट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत हे अधिकारी सहभागी झाले होते.
Devastating news from Rajouri. We have lost a dedicated officer of the J&K Administration Services. Just yesterday he was accompanying the Deputy CM around the district & attended the online meeting I chaired. Today the residence of the officer was hit by Pak shelling as they…
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
पाकिस्तानच्या लाहोर शहरात ड्रोन हल्ला झाला असून श्रीनगरमध्येही सतत स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत.
पाकिस्तानकडून भारतावर फतेह-1 मिसाइलने हल्ला करण्यात आला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी फतेह-1 मिसाइल हवेतच नष्ट केलं. फतेह-1 ही बॅलेस्टिक मिसाइल असून ती खतरनाक मानली जाते.
पाकिस्तानाकडून करण्यात आलेले हल्ले आणि दाव्यांसंदर्भात भारतीय सैन्याकडून 10 वाजता प्रेस ब्रीफिंग होणार आहे. आधी पहाटे 5.45 वाजता पत्रकार परिषद होणार होती. पण आता 10 वाजता ही पत्रकार परिषद होईल असं सांगण्यात आलं आहे.
भारताने बॅलेस्टिक मिसाइलद्वारे तीन एअरबेसना टार्गेट केलं. रात्री उशिरा भारताने पाकिस्तानात एकापाठोपाठ एक 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागले. यात रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, शोरकोटमध्ये रफ़ीकी एअर फोर्स तळ आणि मुरीद एअरफोर्स बेसला टार्गेट करण्यात आलं. भारताकडून अजून याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
भारताने बॅलेस्टिक मिसाइलद्वारे तीन एअरबेसना टार्गेट केलं. रात्री उशिरा भारताने पाकिस्तानात एकापाठोपाठ एक 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागले. यात रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, शोरकोटमध्ये रफ़ीकी एअर फोर्स तळ आणि मुरीद एअरफोर्स बेसला टार्गेट करण्यात आलं. भारताकडून अजून याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची अजित डोवाल यांची बैठक सुरु
पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची अजित डोवाल यांची बैठक संपलीय
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख उत्तर दिलं. त्यानंतर पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताने यानंतर पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले. दोन्ही देशात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार हल्ले सुरु आहेत. अशात या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध पुकारलं आहे. पाकिस्तानी सरकारच्या प्रवक्त्याकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे.
गुजरातमधील हरामी नाल्याजवळ पाकिस्तानी ड्रोन दिसला, भारताने तो पाडला
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमृतसर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की यापुढे कोणतीही मॉक ड्रिल आयोजित केली जाणार नाही. जर हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजला, तर तो थेट हल्ल्याची शक्यता दर्शवेल. यानंतर नागरिकांनी त्वरित ब्लॅकआऊट करणे अनिवार्य असेल. हल्ल्याच्या स्थितीत ब्लॅकआऊट करणे बंधनकारक असेल. सामान्य नागरिक आणि सरकारी विभागांना हल्ल्याच्या वेळी जे निर्देश देण्यात आले आहेत, त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे अमृतसर प्रशासनाने सांगितले आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय मेळावा रविवारी 11 मे रोजी पेझारी येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे देशातील सैनिकांना पाठींबा देण्यासाठी हा मेळावा रद्द करण्यात आला आहे. याबाबत आज तातडीची बैठक घेऊन जिल्हा चिटणीस मंडळाने ठराव घेतला आहे.
भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला
युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी
गुजरातमध्ये 15 मे पर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी
भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांनी उभारले बंकर
बंकर लाईनवर २४ तास बीएसएफ जवान तैनात
काल पाकिस्तानकडून पंजाबमध्ये हल्ल्याचा प्रयत्न
रात्री १० वाजता बॉम्बचे आवाज आल्याचा स्थानिकांचा दावा
रोडालाकलाह भारत पाकिस्तान सीमेवरील शेवटच गाव
रात्री ९ वाजता आर्मीकडून करण्यात येत लाईन बंद करण्याचं आवाहन
‘रात्रीच्या वेळी भिती तर वाटते मात्र भारतीय जवान आमच्यासोबत आहेत’
सीमेवरील गावकऱ्यांची प्रतिक्रिया
भारत पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नाशिकच्या रामकुंड गोदा घाट परिसरात मॉक ड्रिल करण्यात आलं. आपत्तीच्या काळात पर्यटनस्थळी पर्यटक अडकल्यास आणि आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास कशा पद्धतीने काळजी घेतली गेली पाहिजे याचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं.
अटारी बॉर्डरवरच्या Loc वर तणावपूर्ण शांतता
बीएसएफ जवानांकडून सीमेवर घातली जात आहे गस्त
पाकिस्तानकडूनही सीमेवरील हालचालींवर लक्ष
पाकिस्तानात जाणारे सगळे मार्ग बंद
घरात घुसून सडेतोड उत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानचे नापाक प्रयत्न सुरुच आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर राजौरीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोकप्रतिनिधींनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत सर्व औषध कंपन्यांचे सीएओ आणि सीएडी उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्र्यांकडून आरोग्य सेवेच्या उपलब्धतेबाबत बैठकीत चर्चा केली जात आहे. तसेच भारत-पाकिस्तान सीमेजवळील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थिती दरम्यान महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाची संध्याकाळी साडे पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेकडे साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे.
पाकने केलेल्या हल्ल्यात पुंछमध्ये मोठं नुकसान झालं आहे. पूंछमधील सामन्य नागरिकही पाकच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यात स्थानिकांच्या दुकानाचंही नुकसान झालंय, याबाबतची माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत 2 तास बैठक झाली आहे. संरक्षण मंत्र्यांनी या बैठकीतून सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच वायू सेनेच्या प्रमुखांनी या बैठकीत संरक्षण मंत्र्यांना कारवाईची माहिती दिली.
पाकने जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने पाकचे हल्ले उधळून लावले. पाकचे ड्रोन हल्ले भारताने हवेतच परतवले. आपली कारवाई पाकच्या कुरापतींमुळे सुरु झाली, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी माध्यमांसह बोलताना दिली.
आज सर्व महत्त्वाच्या मंत्रालयांच्या बैठका होत आहेत. संरक्षण, गृह, अर्थ आणि आरोग्य मंत्रालयांच्या बैठका होत आहेत. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत. या बैठका त्यांच्या संबंधित मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झाल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था, सीमावर्ती राज्ये, आर्थिक व्यवस्था आणि आरोग्य सेवांचा आढावा घेतला जात आहे.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की ” आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही. आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणी हल्ला केला पण नागरिकांवर नाही. कृषी विभाग म्हणून अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे ही आमची जबाबदारी आहे. आमचे कृषी साठे भरलेले आहेत. गहू, तांदूळ किंवा इतर धान्य असो, आमच्याकडे पुरेसा साठा आहे. सैनिक सीमेवर तैनात आहेत आणि शास्त्रज्ञ शेतात शेतकऱ्यांसोबत आहेत. शेतात शेतकऱ्यांसोबत काम करणे आणि उत्पादन वाढवणे ही आमची जबाबदारी आहे.”
भारत आणि पाकिस्तानमधील ताज्या परिस्थिती लक्षात घेता, इंडिगो एअरलाइन्सने श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, किशनगड, राजकोट येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान सेवा 10 मे पर्यंत रद्द केल्या आहेत.
माजी संरक्षण मंत्री ए.के. भारत-पाकिस्तान तणावावर अँटनी म्हणाले, “सीमावर्ती भागातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. भारताने निष्पाप पर्यटकांना न्याय देण्यासाठी प्रत्युत्तर दिले. आम्हाला युद्ध नको आहे, परंतु दहशतवादी कारवाया पाकिस्तानी सैन्याच्या संगनमताने आणि पाठिंब्याने सुरू झाल्या. त्यांनीच त्या सुरू केल्या. राजकारण, धर्म, जातीच्या नावाखाली देशात कोणत्याही प्रकारची फूट पाडणारी कारवाया टाळणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी भारतीय सैन्यासोबत एकजूट दाखवली पाहिजे.”
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नड्डा सर्व आरोग्य केंद्रे आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतील. या बैठकीत देशभरातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जाईल.
पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या आहेत की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीमुळे सीमेवरील लोक, महिला आणि मुले बेघर होत आहेत आणि घाबरत आहेत. दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि ही परिस्थिती कमी करावी. दोन्ही बाजूंचे नागरिक मारले जात आहेत. मुले मारली जात आहेत, महिला मारल्या जात आहेत. लष्करी हस्तक्षेप नको, तर राजकीय हस्तक्षेप असावा.
पाकिस्तान आणि भारता दरम्यान युद्धाची स्थिती सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केल्याने परिस्थिती चिघळली आहे. युद्ध झालं तर पाकिस्तानचंच नुकसान होणार असल्याने पाकिस्तानी नागरिकच नव्हे तर पाकिस्तानी खासदारही बिथरले आहेत. पाकिस्तानचे एक खासदार शाहीद अहमद यांनी तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घ्यायलाही घाबरत आहेत, असा हल्लाच शाहीद अहमद यांनी चढवला आहे.
पाकिस्तानात आर्मी चीफ असीम मुनीर यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. मुनीर यांच्यामुळेच युद्ध लादल्या गेलं आहे. त्यांच्या कुरापतीमुळेच भारत डिवचला गेला असून देश संकटात सापडला आहे. त्यामुळे मुनीर यांची तातडीने पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी पाकिस्तानी नागरिक करत आहेत. तर, एकीकडे युद्ध सुरू झालेलं असताना मुनीर मात्र तीन दिवसांपासून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
छगन भुजबळ यांच्या माध्यमांशी संवादातील मुद्दे…
* अमेरिकेसह सर्व देशांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून दहशतवाद संपवला पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे
* ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेने पाकिस्तानला बजावले होते की प्रति हल्ला करू नका तरी देखील पाकिस्तानने आगळीक केली भारतावर ड्रोन च्या माध्यमातून हल्ला केला
* मात्र आपल्याकडील रशियन सामग्रीच्या माध्यमातून ड्रोन हल्ले ताबडतोब परतवण्यात आले
* सध्याची परिस्थिती म्हणजे जाहीर न झालेल्या युद्धच म्हणायला हरकत नाही… कारण हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला
* दहशतवाद्यांना मारणे हा भारताचा हक्क आहे
* मात्र तरी देखील पाकिस्तानने आपल्या काही शहरांवर हल्ले केले लाईन ऑफ कंट्रोलवर देखील गोळीबार केला त्यात निष्पाप नागरिक ठार झाले
* आता त्याला नरेंद्र मोदीसाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सडेतोड उत्तर देण्याचं काम नौदल हवाई दल आणि आर्मी करत आहेॉ
* पाकिस्तान हल्ला करण्याच्या शक्यतेमुळे कालची धर्मशाळा येथील आयपीएलची मॅच रद्द करून ब्लॅकआऊट करण्यात आले
* आपले काम एवढेच आहे की अशा गंभीर परिस्थितीत सरकारच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
* आपले सैन्य फ्रंटवर लढत आहे मात्र त्याच्या पाठीमागून त्यांना अनेक गोष्टी पुरवणे आपले कर्तव्य आहे
पाकिस्तानने भारताच्या काही शहरांना टार्गेट केल्यानंतर भारताने जशास तसे उत्तर दिलं आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून बॉर्डरवर गोळीबारही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभर दिल्लीत बैठकांचं सत्र पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे बड्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज संध्याकाळी वित्तीय संस्था आणि सायबर सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतील. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा हे देशभरातील रुग्णालये आणि आरोग्य सुविधांची बैठक घेतील. त्यानंतर फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा करतील. देशातील औषधांच्या साठ्याचा आढावा घेतला जाणार आहे.