AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Pakistan War Situation : इस्लामाबाद ते लाहोर फक्त धूर… रात्री काय घडलं ? सहा महत्त्वाच्या अपडेट

India Pakistan War : सलग तीन दिवसांपासून ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताची काल रात्री भारताने चांगलीच हेकडी उतरवली आहे. भारताने या सर्व हल्ल्यांना अत्यंत चोख आणि कठोर प्रत्युत्तर दिलं आहे. रात्रभर काय घडलं? त्याचे सहा महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या.

India Pakistan War Situation : इस्लामाबाद ते लाहोर फक्त धूर... रात्री काय घडलं ? सहा महत्त्वाच्या अपडेट
india pakistan war
| Updated on: May 10, 2025 | 1:24 PM
Share

भारत-पाकिस्तानमध्ये शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारताच्या 26 लोकेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानच्या अनेक शहरांना लक्ष्य केलं. भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्ताने आपली एअर स्पेस बंद केली आहे. जाणून घ्या सहा मोठ्या अपडेट्स.

1 भारताने पाकिस्तानच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोर्कोट) एअरबेसवर प्रभावी हल्ले केले. यामध्ये त्यांचं मोठ नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या सैन्य इन्फ्रास्ट्रक्चरला हा मोठा धक्का मानला जात आहे. सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे.

2 पाकिस्तानने आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपला एअरस्पेस पूर्णपणे बंद केला आहे. पेशावरला जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सची फ्लाइट PIA218 ला क्वेटा येथे उड्डाण करताना पाहण्यात आलय.

3 पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर आणि अन्य काही मोठ्या शहरात स्फोटाचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की, भारताने बॅलेस्टिक मिसाइल्स डागले.

4 पाकिस्तानने काल सलग तिसऱ्यादिवशी ड्रोन हल्ले केले. भारताने याला पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम घाटी आणि सियालकोटमध्ये हल्ले करुन चोख प्रत्युत्तर दिलं.

5 सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आलेत. यामध्ये सरसा क्षेत्रात भारताने पाकिस्तानच्या लॉन्ग रेंज मिसाइल यशस्वीरित्या रोखल्याच दिसत आहे. सरसाच्या जिल्हा सूचना अधिकाऱ्याने नागरिकांना घराच्या आतच रहाण्याचा सल्ला दिला आहे.

6 पाकिस्तानकडून भारतावर फतेह-1 मिसाइलने हल्ला करण्यात आला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी फतेह-1 मिसाइल हवेतच नष्ट केलं. फतेह-1 ही बॅलेस्टिक मिसाइल असून ती खतरनाक मानली जाते.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.