AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या अण्वस्त्रांपर्यंत पोहचला होता भारत?, नूर खान एअरबेस उद्ध्वस्त, ‘त्या’ विध्वंसात लपलेले शस्त्रसंधीचे रहस्य?

न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत म्हटले आहे की, नूर खान एअरबेसवरील हल्ला हा पाकिस्तानला एक इशारा होता. भारताचे पुढील लक्ष्य पाकिस्तानचे अणू कमांड सेंटर असू शकते. भारताला न्यूक्लियर कमांड सेंटरवर हल्ला करून पाकिस्तानची अणुहल्ला करण्याची क्षमता नष्ट करायची होती.

पाकिस्तानच्या अण्वस्त्रांपर्यंत पोहचला होता भारत?, नूर खान एअरबेस उद्ध्वस्त, 'त्या' विध्वंसात लपलेले शस्त्रसंधीचे रहस्य?
भारत-पाकिस्तान तणाव
| Updated on: May 12, 2025 | 10:10 AM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 पर्यंटकांची हत्या केली. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ 7 मे रोजी नष्ट केली. त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली. या कारवाईत 10 मे रोजी पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसवरील कारवाई आहे. या ठिकाणी भारताने केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर उघडे पडले. तसेच पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला.

10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी जाहीर झाली. त्या शस्त्रसंधीच्या निर्णयात नूर खान एअरबेसचे नुकसान आणि पाकिस्तानचे अण्वस्त्र कमांड सेंटरला निर्माण झालेला धोका हे एक कारण आहे. रावळपिंडी हे पाकिस्तानी सैन्याचे मुख्यालय आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने या शहरावर सर्वात मोठा हल्ला केला. नूर खान एअरबेस रावळपिंडीमध्येच आहे. या ठिकाणी पाकिस्तानी हवाई दल त्यांच्या लढाऊ विमानांमध्ये इंधन भरते. विमानांची दुरुस्ती केली जाते. या ठिकाणावरुन पाकिस्तानचे व्हीव्हीआयपी नेते परदेश दौऱ्यांवर विमानाने जातात. या एअरबेसवर भारताने मोठे हल्ला केले. यामुळे पाकिस्तानी सैन्य हादरले गेले.

न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत म्हटले आहे की, नूर खान एअरबेसवरील हल्ला हा पाकिस्तानला एक इशारा होता. भारताचे पुढील लक्ष्य पाकिस्तानचे अणू कमांड सेंटर असू शकते. भारताला न्यूक्लियर कमांड सेंटरवर हल्ला करून पाकिस्तानची अणुहल्ला करण्याची क्षमता नष्ट करायची होती. त्यामुळे घाबरलेल्या शाहबाज शरीफ यांनी लगेच अमेरिकेला फोन केला.

भारतने 10 मे रोजी नूर खान एअरबेससोबत चकवालमधील मुरीद आणि शोरकोटमधील रफीकी एअरबेसवर हल्ला केला. त्यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. पाकिस्तान हे क्षेपणास्त्र ट्रॅकसुद्धा करु शकला नाही. त्यामुळे नूर खान एअरबेसचे मोठे नुकसान झाले. पाकिस्तान या एअरबेसवरुन टोही मिशन चलवतो. लांब टप्प्याचा क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी हे एअरबेस आहे. भारताने या एअरबेसवर मारा करुन पाकिस्तानची लांब टप्पावरील क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता नष्ट केली.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....