आनंदाची बातमी: भारतात 63 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

सोमवारी देशातील कोरोना मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून आली. 77 दिवसांनंतर सोमवारी देशात प्रथमच कोरोना मृतांच्या संख्येत घट दिसून आली.

आनंदाची बातमी: भारतात 63 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 9:08 AM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून जगातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र झालेल्या भारतातील परिस्थिती आता सुधारण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण, सोमवारच्या आकडेवारीनुसार 63 दिवसांनंतर देशात प्रथमच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले. सोमवारी देशात कोरोनाच्या 53,082 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 10 ऑगस्टनंतर देशात पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या इतकी खाली आली आहे. 10 ऑगस्टला देशात कोरोनाचे 51,296 रुग्ण सापडले होते. यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला होता. (India records lowest fresh Covid cases)

मध्यंतरी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा एक लाखाच्या जवळपासही जाऊन पोहोचला होता. साधारण पंधरा दिवस देशात दरदिवशी 85 ते 90 हजाराच्या आसपास रुग्ण सापडत होते. त्यामुळे देशभरात काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावण्याची लक्षणे दिसू लागल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

दरम्यान, सोमवारी देशातील कोरोना मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून आली. 77 दिवसांनंतर सोमवारी देशात प्रथमच कोरोना मृतांच्या संख्येत घट दिसून आली. यापूर्वी 27 जुलैला देशात 638 मृत्यू झाले होते. तर सोमवारी हा आकडा 696 इतका नोंदवण्यात आला.

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आता ७० लाखांहून अधिक झाली आहे. देशभरात सध्या 8,61,853 जणांवर उपचार सुरु आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 12.10 टक्के इतके आहे. देशातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 86.36 इतके आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही सोमवारी नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती.

जॉन्सन अँण्ड जॉन्सनने लसीची चाचणी थांबवली

अमेरिकेच्या जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन (Johnson & Johnson) कंपनीने लसीचं ट्रायल थांबवलं आहे. लसीच्या अंतिम टप्प्यात चाचणी सुरू असताना एक रुग्ण आजारी पडल्याने तात्काळ ही लस थांबवण्यात आली आहे. (coronavirus vaccine johnson and johnson stop covid vaccine trial) जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनकडून यांसंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की, आम्ही आमच्या सगळ्या कोविड-19 लसीच्या क्लिनिकल ट्रायल तात्पुरत्या थांबवत आहोत. लसीची रुग्णांवर चाचणी करताना रुग्ण आजारी पडल्याने ट्रायल थांबवलं असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या: 

कोरोनाची लस पहिल्यांदा कोणाला देणार; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात….

कोणताही धर्म आणि देव सणांसाठी जीव धोक्यात टाकायला सांगत नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

असंख्य मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्याचीच आली दु:खद बातमी, रिपोर्ट येताच जीव गेला

(India records lowest fresh Covid cases)

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.