AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 5 ते 25 रुपये तिकीट, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार; कसा असेल रूट?

17 जुलै 2026 रोजी म्हणजेच उद्यापासून भारत रेल्वेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील जिंद येथून देशातील पहिल्या हरित हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या ट्रेनची वैशिष्टये काय आहेत ते पाहा....

केवळ 5 ते 25 रुपये तिकीट, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार; कसा असेल रूट?
hyderogen train
| Updated on: Jul 16, 2026 | 12:54 PM
Share

भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. देशातील पहिली हरित हायड्रोजन ट्रेन सुरू होण्यासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हरियाणातील जिंद येथून या ऐतिहासिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. स्वच्छ, हरित आणि शून्य-उत्सर्जन वाहतुकीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर हायड्रोजन ट्रेनचे फोटो पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी लिहिले, “भारताची पहिली हायड्रोजन-चालित ट्रेन हरियाणातून सुरू होणार आहे.” पंतप्रधान मोदींच्या पोस्टमुळे या प्रकल्पाबद्दल जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या “हायड्रोजन फॉर हेरिटेज” या उपक्रमाचा एक भाग आहे. या योजनेअंतर्गत, रेल्वे भविष्यात आणखी 35 हायड्रोजन ट्रेन्स सुरू करण्याची तयारी करत आहे, जेणेकरून वारसा आणि ग्रामीण मार्गांवर धावणाऱ्या जुन्या डिझेल इंजिनांना एक पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होईल.

ट्रेनची वैशिष्ट्ये ही नवीन ट्रेन 10 डब्यांची हायड्रोजन-चालित डीईएमयू म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. यात 682 जागा असून एकूण 2,600 प्रवाशांची क्षमता आहे. चाचणीदरम्यान, ट्रेनने ही मर्यादा ओलांडली, परंतु नियमित संचालनासाठी तिचा कमाल वेग ताशी 75 किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. हा अजूनही एक प्रायोगिक प्रकल्प असल्याने, त्याची अंमलबजावणी नियंत्रित आणि सावधगिरीने केली जात आहे. या ट्रेनचे भाडे हे 5 ते 25 रुपये इतके असणार आहे.s

माध्यमाच्या वृत्तानुसार, हायड्रोजन ट्रेन फिरत्या ऊर्जा प्रकल्पांमध्ये कार्य करतात. हाटड्रोजन वायू आणि बाहेरील वातारणातील ऑक्सिजन एका इंधन सेलमध्ये एकत्र केले जातात. या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्माण होते, जी ट्रेनच्या इलेक्ट्रिक मोटर्सना उर्जा पुरवते. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही हानिकारक धूर उत्सर्जित होत नाही, त्याऐवजी, केवळ पाण्याची वाफ आणि उष्णता निर्माण होते.

तज्ञांच्या मते, या ट्रेनचा उद्देश रेल्वे नेटवर्कला कार्बनमुक्त करणे आहे, विशेषतः अशा मार्गांवर जिथे ओव्हरहेड पॉवर लाईन्स टाकणे अवघड किंवा अत्यंत महाग आहे. हायड्रोजन ट्रेन इलेक्ट्रिक ट्रेनसारखेच पर्यावरणीय फायदे देतात, परंतु त्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधांची आवश्यकता नसते आणि डिझेल ट्रेनप्रमाणेच काही मिनिटांतच त्यात इंधन भरून त्या धावू शकतात.

Follow Us
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड