भारताची सागरीशक्ती आणखी मजबूत, सुपरसोनिक मिसाईल टॉरपीडोमुळे भारताच्या दुष्मनांना धडकी

भारताची सागरीशक्ती आणखी मजबूत, सुपरसोनिक मिसाईल टॉरपीडोमुळे भारताच्या दुष्मनांना धडकी

भारताने आज ओडिशात एक नवीन सुरसोनिक मिसाईल टॉरपीडोची यशस्वी चाचणी पार पाडली आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला आणखी मोठा हातभार लागला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 13, 2021 | 7:18 PM

ओडिशा : भारतीय सैन्याची ताकद दिवसेंदिवस मजबूत होत असतानाचा भारत आपल्या आंतराळातील कामगिरीमुळेही आणखी मजबूत होत आहे. भारताने आज ओडिशात एक नवीन सुरपसोनिक मिसाईल टॉरपीडोची यशस्वी चाचणी पार पाडली आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला आणखी मोठा हातभार लागला आहे. ही चाचणी अँटी सबमरीन वारफेअर क्षमतेला वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान देणार आहे.

ओडिशात यशस्वीरित्या चाचणी पूर्ण

ओडिशाच्या बालसोर किणाऱ्यापासून लांब अंतराच्या सुपरसोनिक मिसाईल रिलीज ऑफ टॉरपीडोची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. डिआरडिओने भारतीय नौदलासाठी हे नवे हत्यार विकसित केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डिआरडिओच्या म्हणण्यानुसार, सिस्टमला टॉरपिडोच्या पहिल्या मर्यादेपासून कित्येकपटीने अधिक अँटी सबमरीन वायरफेअर क्षमता वाढवण्यासाठी याला तयार करण्यात आले आहे. डिआरडिओ, आरसीआय हैदराबाद, एडीआरडीई आगरा, एनएसटीएल विशाखापट्टणम सह अनेक संस्थानी या प्रोजेक्टसाठी काम केले आहे.

सागरी लढाई क्षमता मजबूत होणार

ही प्रणाली पुढच्या पिढीचे मिसाईल अधारित स्टैंडऑफ टॉरपिडो डिलीवरी सिस्टम आहे. चाचणीवेळी मिसाईलच्या पूर्ण रेंजच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. यामुळे पाणबुड्यांची फायरक्षमता पहिल्या रेंजपेक्षा वाढण्यास मदत होणार आहे. विभिन्न रेंजच्या रडारद्वारे याची टेहाळणी करण्यात आली आहे. मिसाईलमध्ये एक टॉरपीडो, पैराशूट डिलीवरी सिस्टम आणि रिलीज मॅकेनिज्म होते.

ब्रम्होस सुपरसोनिक क्रूज मिसाईलचेही परिक्षण यशस्वी

भारताने 8 डिसेंबरला ओडिशाच्या किणाऱ्यावरच एकीकृत परीक्षण रेंजद्वारे सुरसोनिक क्रूज मिसाईल ब्रम्होसचे आकाशातून मारा करण्याच्या क्षमतेचीही यशस्वी चाचणी केली आहे. त्यामुळे आता भारताच्या दुष्मनांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित.

MLC election | कोटा कोण पूर्ण करणार? अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीचा उद्या निकाल

गादी वाफ्यावरील पेरणीच कांद्यासाठी वरदान, अवकाळीमुळे मात्र अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली-सचिन सावंत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें