AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडे ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद, अन् होणारी संभाव्य वाहतूक कोंडी

भारत ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे, मात्र हे यजमानपद भूषवत असताना  वाहतुकीत व्यत्यय तसेच वाहतूक कोंडीबाबतच्या समस्या निर्माण होऊ शकतात.  मात्र, या व्यत्ययांकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.

भारताकडे ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद, अन् होणारी संभाव्य वाहतूक कोंडी
BRICS summitImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 7:31 PM
Share

भारत ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे, मात्र हे यजमानपद भूषवत असताना  वाहतुकीत व्यत्यय तसेच वाहतूक कोंडीबाबतच्या समस्या निर्माण होऊ शकतात.  मात्र, या व्यत्ययांकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. भारत ब्रिक्सच्या 11 सदस्य देशांच्या आणि 10 भागीदार राष्ट्रांच्या नेत्यांचे, तसेच इतर निमंत्रित शिष्टमंडळांचे यजमानपद भूषवत आहे. प्रत्येक नेता केवळ एकदाच प्रवास करत नाही. शिखर परिषदेच्या सामान्य वेळापत्रकानुसार, एका दिवसात दोन किंवा तीन वेळा प्रवासाची शक्यता असते. यामध्ये विमानतळावरून हॉटेलकडे, हॉटेलवरून परिषदेच्या स्थळाकडे आणि त्यानंतर द्विपक्षीय बैठका, अधिकृत कार्यक्रम किंवा इतर भेटीगाठींसाठी होणारा नेत्यांच्या प्रवासाचा समावेश आहे.

त्यामुळे, वरवर पहाता हा केवळ काही मोजक्या व्हीआयपी लोकांचा प्रवास वाटू शकतो. परंतु ब्रिक्स शिखर परिषदेचं व्यापक स्वरुप लक्षात घेता, एका दिवसामध्ये अशा प्रकारच्या 70 ते 80 व्हीआयपी फेऱ्यांची शक्यता आहे. या प्रत्येक नेत्यांसाठी  स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था करावी लागते, ज्यामध्ये वाहतूक नियंत्रण, प्रवेशावर निर्बंध आणि मार्गांचे समन्वय यांचा समावेश असतो. म्हणूनच, सामान्य ‘व्हीआयपी’ दौऱ्याच्या तुलनेत वाहतुकीवर होणारा परिणाम येथे अधिक तीव्र असतो.

तसेच, ही परिषद अशा वेळी होत आहे जेव्हा जागतिक स्तरावर सुरक्षेचे धोके वाढले आहेत आणि अनेक प्रदेशांमध्ये युद्धे व भू-राजकीय तणाव निर्माण झाले आहेत. हे नेते भारताचे पाहुणे आहेत आणि यजमान देश म्हणून, अशा महत्त्वाच्या बैठकीसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या सुरक्षेतच त्यांची ने-आण होईल, याची हमी भारताने दिली आहे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर आहे.

वाहतुकीतील असे व्यत्यय केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत; कारण जेव्हा जगातील प्रमुख राजधान्यांमध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा आयोजित केल्या जातात, तेव्हा तात्पुरते वाहतूक निर्बंध, सुरक्षित मार्ग (secure corridors) आणि प्रवेश नियंत्रण या गोष्टी नेहमीच्याच असतात.

भारताचे भू-राजकीय आणि आर्थिक महत्त्व जसजसे वाढत जाईल, तसतसे जागतिक शिखर परिषदा, धोरणात्मक चर्चा आणि उच्च-स्तरीय राजनैतिक भेटीगाठींसाठी भारत स्वाभाविकपणे एक महत्त्वाचे केंद्र बनेल. जागतिक  नेते भारतात येतील, येथे अधिक आंतरराष्ट्रीय चर्चांचे आयोजन केले जाईल आणि दिल्ली जागतिक मुत्सद्देगिरीच्या प्रमुख राजधानींपैकी एक म्हणून  महत्त्वाची भूमिका बजावेल

Follow Us
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात