AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 वर्षांपूर्वीचं पाकिस्तानमधील गाणं, ज्याची भारतात प्रचंड क्रेझ, पुन्हा-पुन्हा रेडिओवर लावण्याची होती मागणी

40 वर्षांपूर्वीचं पाकिस्तानीमधील गाणं, ज्याची भारतात इतकी क्रेझ की 40 वर्षांपासून रेडिओवर पुन्हा-पुन्हा लावण्याची केली जात होती मागणी. आजही प्रचंड लोकप्रिय.

40 वर्षांपूर्वीचं पाकिस्तानमधील गाणं, ज्याची भारतात प्रचंड क्रेझ, पुन्हा-पुन्हा रेडिओवर लावण्याची होती मागणी
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 10, 2026 | 7:12 PM
Share

1980 च्या दशकात रेडिओ आणि कॅसेट प्लेअर हे मनोरंजनाचं प्रमुख साधन होतं. त्याच काळात एक असं गाणं आलं, ज्याच्या तालावर भाषा न समजणारेही थिरकू लागले. पाकिस्तानातून भारतात पोहोचलेल्या ‘हवा हवा ऐ हवा’ या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे या गाण्याची लोकप्रियता इतकी मोठी आहे की अनेक दशकांनंतरही त्याची क्रेझ कायम असून, अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटातही या गाण्याचा वापर करण्यात आला.

पाकिस्तानी पॉप गायक हसन जहांगीर यांचं ‘हवा हवा’ हे गाणं 1986 मध्ये रेकॉर्ड करण्यात आलं आणि 1987 मध्ये रिलीज झालं. गाण्याची भन्नाट बीट आणि सहज लक्षात राहणारी धून यामुळे ते काही काळातच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात लोकप्रिय झालं. रेडिओवर हे गाणं वारंवार ऐकायला मिळत होतं, तर त्याच्या कॅसेट्सचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.

हसन जहांगीर यांच्या मते, या गाण्याची बीटच अशी आहे की ती कोणत्याही संस्कृतीशी सहज जुळून जाते. त्यामुळे भाषेची अडचण असूनही गाण्याचा ठेका श्रोत्यांना आकर्षित करत राहिला. ‘हवा हवा ऐ हवा’ हे केवळ एक लोकप्रिय गाणं न राहता त्या काळातील एका संपूर्ण पिढीच्या आठवणींचा भाग बनलं.

‘हवा हवा’ची मूळ धून कुठून आली?

या गाण्याची कथा पाकिस्तानपासून नाही तर इराणपासून सुरू होते. 1970 च्या दशकात इराणी सायकेडेलिक रॉक संगीताचे गॉडफादर मानले जाणारे कूरोश यागमई यांनी ‘हवा हवा’ नावाचं फारसी गाणं सादर केलं होतं. प्रेम आणि प्रतीक्षेची भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याची धून पुढे सीमापार पोहोचली.

‘धुरंधर’मुळे पुन्हा चर्चेत

अनेक दशकांचा प्रवास करूनही ‘हवा हवा ऐ हवा’ची लोकप्रियता कमी झालेली नाही. ‘धुरंधर’ चित्रपटात संजय दत्त यांच्या एंट्रीच्या प्रसंगी या गाण्याचा वापर करण्यात आल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या पिढीलाही या गाण्याच्या भन्नाट ठेक्याशी जोडण्याचं काम या वापरामुळे झालं आहे.

पाकिस्तानातून भारतात आलेलं हे गाणं, त्यामागची इराणी धून आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये झालेला त्याचा प्रवास पाहता ‘हवा हवा ऐ हवा’ हे केवळ एक गाणं नसून, सीमांच्या पलीकडे पोहोचलेल्या संगीताच्या लोकप्रियतेचं एक भन्नाट उदाहरण ठरतं.

Follow Us
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?