भारतात फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल; केंद्रीय समितीचे भाकीत

भारतात फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ आटोक्यात येईल; केंद्रीय समितीचे भाकीत

केंद्रीय समितीने वर्तविलेला अंदाज भारताच्यादृष्टीने अत्यंत आशादायक बाब मानली जात आहे. | Coroanvirus surges in India

Rohit Dhamnaskar

|

Oct 19, 2020 | 7:54 AM

नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने शिखर गाठण्याचा (Peak Point) कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरत राहिल्यास 2021च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशातील कोरोनाची साथ आटोक्यात येईल, असा अंदाज केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीने वर्तविलेला अंदाज भारताच्यादृष्टीने अत्यंत आशादायक बाब मानली जात आहे. (Coronavirus surges in India)

आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारने दहा शास्त्रज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीकडून कोरोनाच्या भारतातील प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी नवीन गणितीय प्रारूप (मॉडेल) विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार भारतात सप्टेंबर महिन्यातच कोरोना प्रादुर्भावाने शिखर (Peak point) गाठले होते. सप्टेंबरच्या मध्यात देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 10.17 लाख इतकी होती. परंतु, तोपर्यंत आपण वैद्यकीय सुविधा आणि चाचण्यांसह सर्व बाबतीत सक्षम झालो होतो. परिणामी गेल्या महिन्याभरात या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी ती हिवाळा आणि सणासुदीमुळे होईल, असे निरीक्षण या समितीने नोंदवले.

फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास तोवर रुग्णांची एकूण संख्या 1.6 कोटीपर्यंत पोहोचू शकते. नियमांचे नीट पालन न केल्यास सणासुदीच्या दिवसांत रुग्ण संख्या आणखी 26 लाखांनी वाढण्याचा धोका आहे, असे समितीने म्हटले आहे.

तसेच मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय योग्य असल्याचेही समितीने सांगितले. देशात लॉकडाऊन लागू झाला नसता तर येत्या जूनपर्यंत 1 कोटी 40 लाख लोकांना संसर्ग झाला असता. देशातील आरोग्यव्यवस्थेवर अभूतपूर्व ताण पडला असता. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढली असती. बळींचा आकडा 26 लाखांपर्यंत गेला असता. टाळेबंदीसाठी आपण मेपर्यंत थांबलो असतो तर जून महिन्यातच 50 लाख लोकांना संसर्ग झाला असता, असेही समितीच्या अहवालात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

Corona Vaccine | नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्यासाठी व्यवस्था करा : पंतप्रधान मोदी

(Coronavirus surges in India)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें