AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : सॅल्युट, भारतीय सैन्याचा हा नवीन VIDEO बघा, तुमची छाती अभिमानाने भरुन येईल

Operation Sindoor : भारताची तिन्ही सैन्य दल सध्या पाकिस्तानला धडा शिकवत आहे. घुसके मारेंगे असं पीएम बोलले, तसं प्रत्यक्षात सीमेपलीकडे सुरु आहे. आता भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची छाती अभिमानाने भरुन येईल.

Operation Sindoor : सॅल्युट, भारतीय सैन्याचा हा नवीन  VIDEO बघा, तुमची छाती अभिमानाने भरुन येईल
Indian Army
| Updated on: May 10, 2025 | 1:05 PM
Share

भारतीय सैन्याच ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु आहे. 7 मे च्या रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केले. लश्कर, जैश आणि हिजबुल मुजाहिदीन हे दहशतवादाचे अड्डे उडवलं. त्यानंतरही भारतीय सैन्याकडून सीमेपलीकडे असलेले टेरर लॉन्च पॅड्स उद्धवस्त करण्याच काम सुरु आहे. इंडियन आर्मीने दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओच्या बॅक ग्राऊंडला ‘कदम-कदम बढ़ाये जा, खुशी के गीत गाये जा… ये जिन्दगी है कौम की, तू कौम पे लुटाये जा’ या गाण्याची म्युझिक सुरु आहे. भारतीय जवान हेवी आर्टिलरी गनद्वारे पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील एक-एक दहशतवादी तळ नष्ट करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा मनोमन इंडियन आर्मीला सॅल्युट करालं.

‘भारतीय सैन्याने दहशतवादी लॉन्चपॅड उद्धवस्त केले. 08 आणि 09 मे 2025 च्या रात्री जम्मू-कश्मीर आणि पंजाबच्या अनेक शहरात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. पाकिस्तानच्या या दुस्साहसाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड मातीत मिळवले. ते नष्ट केले. नियंत्रण रेषेच्याजवळ पाकव्याप्त काश्मीरमधील हे दहशतवादी लॉन्चपॅड भारतीय नागरिक आणि सुरक्षा पथकांवर हल्ल्यासाठी वापरले जात होते. भारतीय सैन्याने त्वरित आणि निर्णायक कारवाई करत दहशतवादाच इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्षमतेला मोठा झटका दिला आहे.

इंग्रजांनी या गाण्याला देशद्रोही ठरवलेलं

वंशीधर शुक्ल द्वारा लिखित आणि राम सिंह ठाकुरी द्वारा रचित ‘कदम कदम बढ़ाये जा…’ एक देशभक्तीपर गाणं आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आजाद हिंद सेनेचे सैनिक हे गाणं गायचे. या गाण्याला द्वितीय विश्व युद्धानंतर 1942 साली इंग्रजांनी देशद्रोही ठरवून भारतात प्रतिबंध घातला होता. ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या गाण्यावरील बंदी हटवण्यात आली. तेव्हापासून भारतातील हे एक लोकप्रिय देशभक्ती गीत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.