AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय लष्कराला मोठे यश, पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना घेरले

जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला आहे. भारतीय लष्कारातील अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरले असल्याचे वृत्त आहे. सहा दहशतवाद्यांना घेरण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

भारतीय लष्कराला मोठे यश, पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना घेरले
pahalgaon attack
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 29, 2025 | 10:01 AM
Share

Pahalgaon Attack: जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला आहे. भारतीय लष्कारातील अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरले असल्याचे वृत्त आहे. सहा दहशतवाद्यांना घेरण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. काश्मीरमधील जंगलात लपलेल्या या हल्लेखोर दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरले आहे. त्या दहशतवाद्यांसोबत सध्या भारतीय जवानांची चकमक सुरु आहे. परंतु ही चकमक नेमकी कुठे सुरु आहे, त्याबाबत टीव्ही 9 ला अद्याप माहिती मिळाली नाही.

पाकिस्तान व्याप्त काश्मीरकडे जात होते…

पहलगाम हल्ल्यातील दहशवादी अद्याप पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पोहचले नाही. त्या दहशतवाद्यांचा शोध गेल्या आठवडाभरापासून सुरु होता. मंगळवारी ते दहशतवादी काश्मीरच्या जंगलांमध्ये सापडले. त्यानंतर सर्व सहा दशतवाद्यांना लष्कराने घेरले आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे दहशतवाद्यांना वाहन वापरणे शक्य नव्हते. यामुळे हे दहशतवादी चालतच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जात होते.

लष्कराला मिळालेल्या माहितीनंतर सर्व दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले आहे. घटनास्थळी गोळीबार सुरु आहे. या दहशतवाद्यांकडे शस्त्रे असल्यामुळे त्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार सुरु केला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणा २४ तास काम करत होती. सर्वत्र कोबिंग ऑपरेशन सुरु होते. एनआयएकडून या दहशतवाद्यांचा शोध सुरु होता. संशयितांची घरे पाडली जात होती. आता पहलगावपासून काही अंतरावरच हे दहशतवादी सापडले आहे. त्यांच्याकडे चीनी बनावटीचे एक सॅटेलाइट फोन असल्याचे सांगितले जात होते. सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कारातील जवानांनी त्यांना घेरले आहे.

पहलगाव हल्लामागे दहशतवादी हाशिम मूसाचा हात असल्याचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळाले आहे. मूसा हा पाकिस्तानी नागरिक आहे. तो स्पेशल फोर्सेजचा पूर्व कमांडो आहे. त्याला पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुपकडून विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानंतर तो लश्कर-ए-तैयबामध्ये सक्रीय झाला.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...