AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय नागरिक असलेल्या जहाजाचं अपहरण, मोठी खळबळ, थेट…

मोठी बातमी समोर येत आहे, सहा भारतीय क्रू मेंबर्स असलेल्या जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे. सोमालियाच्या किनारपट्टी भागातून या जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भारतीय नागरिक असलेल्या जहाजाचं अपहरण, मोठी खळबळ, थेट...
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 21, 2026 | 8:45 AM
Share

अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून अजूनही वाहतूक सुरळीत झालेली नाही, त्यामुळे जे देश कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत, त्यांना याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढलेला असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. समुद्री चाचांनी सोमालियाच्या किनार पट्टीवरून एका जहाजाचं अपहरण केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजावर एकूण 10 क्रू मेंबर होते, त्यापैकी 6 क्रू मेंबर्स हे भारतीय आहेत. या घटनेबाबत माहिती देताना सोमालियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, समुद्री चाचांनी एका जहाजाचं अपहरण केलं आहे, ते या जहाजाला नुगाल समुद्र किनाऱ्याकडे घेऊन गेले आहेत, या जहाजामध्ये तुर्कस्तानचा शस्त्रसाठा होता.

एका वृत्तवाहिनीला बोलताना सोमालियाच्या अधिकाऱ्याने म्हटलं की, या जहाजाचं सोमवारी पुटलँड पासून जवळपास 3.5 नॉटिकल मैल दूर अंतरावर समुद्री चाचांनी अपहरण केलं आहे. ते या जहाजाला नुगाल समुद्र किनाऱ्याकडे घेऊन गेले आहेत. हे जहाज पोलर मुव्हमेंट शिपिंगच्या मालकीचं असून, या जहाजामधून तुर्कीच्या शस्त्रांची वाहतूक करण्यात येत होती. मोगादिशूमध्ये तुर्कीचं मिलिट्री ट्रेनिंग सेंटर आहे, तिकडेच शस्त्रसाठा घेऊन हे जहाज निघालं होतं. मात्र वाटेतच या जहाजाचं अपहरण करण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या जहाजांमध्ये एकूण दहा जण आहेत, त्यातील सहा हे भारतीय नागरिक आहेत, तर एक तुर्की, एक जॉर्जिया आणि दोन सर्बियाच्या नागरिकांचा समावेश आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आठ समुद्री चाचांनी या जहाजाचं अपहरण केलं आहे. यापूर्वी देखील त्यांनी 26 एप्रिल रोजी एका जहाजाचं अपहरण केलं होतं, आता जहाजाचं अपहरण करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे,  जहाजाचं अपहरण होताच आता तुर्कस्थान अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात