IndiGo Emergency Landing : ब्रेकिंग! भारतात येणाऱ्या विमानाचं पाकिस्तानात इमर्जन्सी लॅन्डिंग, नेमकं असं का केलं गेलं?

| Updated on: Jul 17, 2022 | 9:28 AM

Emergency landing in Pakistan : इंडिगो विमानाचं पाकिस्तानच्या कराचीत इमर्जन्सी लॅन्डिंग कऱण्यात आलं.

IndiGo Emergency Landing : ब्रेकिंग! भारतात येणाऱ्या विमानाचं पाकिस्तानात इमर्जन्सी लॅन्डिंग, नेमकं असं का केलं गेलं?
एकाच दिवसात दोन विमानांचे इमर्जन्सी लँडिंग
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्ली : इंडिगो विमानाचं (IndiGo Airlines) पाकिस्तानच्या कराचीत इमर्जन्सी लॅन्डिंग (emergency landing in Pakistan) करण्यात आलं. शारजाहहून हे विमान हैदराबादच्या दिशेनं झेपावलं होतं. पणं तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचं पाकिस्तानात (Pakistan) इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर विमानाच्या क्रू मेम्बर्सनी तातडीने विमानाचं लॅन्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमानाच्या पायलट्सनी जवळच्या कराची विमानतळाशी संपर्क साधला आणि विमान त्या दिशेनं वळवलं. यानंतर कराची विमानतळावर विमानाचं सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आलं. सुदैवानं वेळीच सुरक्षित लॅन्डिंग केल्यानं मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. आता दुसऱ्या विमानाने प्रवाशांना हैदराबादला आणलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

4 दिवसांत दुसऱ्यांना इमर्जन्सी लॅन्डिंग

गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँन्डिंग करण्यात आलं आहे. याआधी 14 जुलैलाही इंडिगोच्या विमानाचं लॅन्डिंग जयपूर विमानतळावर लॅन्डिंग करण्यात आलेलं होतं. इंजिनमध्ये कंप जाणवू लागल्यानं 14 जुलैला विमान मध्येच लॅन्ड करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली होती. सुरक्षेचा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

थोडक्यात अनर्थ टळला

शारहाज-हैदराबाद विमानाच्या पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली होती, असं इंडिगो एअरलाईन्सच्या वतीने सांगण्यात आलंय. संभाव्य धोका टाळण्यासाठी आधी विमानं लॅन्ड करणं गरजेचं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून हैदराबादच्या दिशेनं निघालेलं विमान कराची विमानतळाच्या दिशेने डायवर्ट करण्यात आलं.

विमानातील प्रवाशांनाही याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे कराचीत उतरवण्यात आलं असून यानंतर विमानातील प्रवाशांना हैदराबादला आणण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही इंडिगो एअरलाईन्सकडून देण्यात आली आहे.