Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway: आता तिकीटांच्या प्रतिक्षा यादीतून सुटका, सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार !

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वेशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देताना महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रवाशांना आता लांबलचक प्रतिक्षा यादीची काळजी करण्याची गरज राहणार नाही. सर्वांना कन्फर्म तिकीटे मिळणार असल्याचा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला आहे.

Indian Railway: आता तिकीटांच्या प्रतिक्षा यादीतून सुटका, सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार !
Follow us
| Updated on: Mar 19, 2025 | 8:22 PM

भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटीहून अधिक लोक प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वेला भारताची लाईफलाईन म्हटले जाते. सणासुदीत मेल आणि एक्सप्रेसला मोठी गर्दी होत असते. त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळताना मारामार होते. युपी आणि बिहार या उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेन बारमाही गर्दी असते.त्यामुळे रेल्वेचे तिकीट(Trains Ticket) मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे आता भारतीय रेल्वे आपल्या नियमात एक बदल करणार आहे.आता सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा टांगता जीव राहणार नाही.

संसदेत रेल्वे संबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी महत्वाची माहीती दिली आहे. प्रवाशाच्या सोयीसाठी आता आसनांच्या हिशेबाने तिकीट विकले जातील. म्हणजे जेवढे सीट असतील तेवढ्याच तिकीटांची विक्री केली जातील. त्यामुळे प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

तिकिटाशिवाय प्रवास केल्या शिक्षा आणि दंड

रेल्वेमध्ये तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुम्ही दंड भरण्यास नकार दिला तर अशा परिस्थितीत प्रवाशाला आरपीएफच्या ताब्यात दिले जाते. यासोबतच रेल्वे कायद्याच्या कलम १३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. आरपीएफ या प्रवाशांना कोर्टासमोर सादर करते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर १००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. हा दंड भरला नाही तर प्रवाशाला ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

सुरक्षेवर विशेष लक्ष

रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की यासाठी अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये लॉन्गर रेल, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी डिव्हाइसेस आणि अनेक प्रमुख पावले उचलण्यात आली आहेत. आता भारतीय रेल्वे मोठा निर्यातदार बनली आहे.

रेल्वे मोठा निर्यातदार

ऑस्ट्रेलियाला मेट्रो कोच निर्यात केले जात आहेत, तसेच आपला देश युनायटेड किंग्डम, सौदी अरेबिया आणि फ्रान्सला रेल्वे कोच निर्यात करीत आहे. तसेच मेक्सिको, स्पेन, जर्मनी आणि इटलीला रेल्वे ऑपरेशनल उपकरणे निर्यात करीत असते.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, लवकरच बिहारमध्ये तयार झालेले इंजिन्स ( लोकोमोटिव्ह ) आणि तामिळनाडूमध्ये बनवलेले रेल्वेची चाके जगभर धावतील. भारतीय रेल्वेने या नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळणार आहे. अन्यथा रेल्वे तिकिटे मिळविण्यात अधिक अडचणी येऊ शकतात.

हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.