AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचाच! या मार्गावरील अनेक गाड्या रद्द, पहा संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या पुढील काही दिवसांत आणि सप्टेंबरमध्ये रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होऊ शकते. कारण ठराविक मार्गांवरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या कोणत्या आहेत आणि कोणत्या मार्गावरील आहेत, त्याची संपूर्ण यादी पहा..

रेल्वेनं प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचाच! या मार्गावरील अनेक गाड्या रद्द, पहा संपूर्ण यादी
Indian RailwayImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2025 | 10:43 AM
Share

भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वांत मोठी रेल्वे व्यवस्था आहे. देशात दररोज अडीच कोटींहून अधिक प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. गेल्या काही वर्षांत रेल्वेचं हे जाळं प्रचंड वाढलं आहे. परंतु अनेकदा रेल्वेच्या दुरुस्तीची कामं हाती घ्यावी लागतात. ज्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते. वेगवेगळ्या रेल्वे विभागांवर नवीन रेल्वे लाइन जोडण्यासाठी काही मार्गांवरील गाड्या रद्द कराव्या लागतात. ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित काही तारखांना आणि सप्टेंबर महिन्यात तुम्ही काही प्रवासाचं नियोजन केलं असेल तर त्यापूर्वी ही यादी एकदा तपासून घ्या.

रेल्वे विभागाकडून ट्रॅक दुरुस्ती आणि तांत्रिक कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे काही मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसांत तुम्ही रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही यादी एकदा वाचून घ्या. रांचीच्या चक्रधरपूर इथून जाणाऱ्या अनेक गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जात आहेत. त्यामुळे जर तुमचा प्रवास या मार्गांवरील असेल, तर एकदा ट्रेनची स्थिती नक्की तपासा.

  • ट्रेन क्रमांक 18175/18176 हटिया-झारसुगुडा- हटिया मेमू एक्स्प्रेस, 18 ऑगस्ट 2025 ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 17007 चर्लपल्ली- दरभंगा एक्स्प्रेस (via- रांची), 26 ऑगस्ट 2025 आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 17008 दरभंगा- चर्लपल्ली एक्स्प्रेस (via- रांची), 29 ऑगस्ट 2025 आणि 12 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 18523 विशाखापट्टणम- बनारस एक्स्प्रेस (via- रांची), 27 ऑगस्ट 2025, 31 ऑगस्ट 2025, 7 सप्टेंबर 2025 आणि 10 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 18524 बनारस – विशाखापट्टणम एक्स्प्रेस (via- रांची), 28 ऑगस्ट 2025, 1 सप्टेंबर 2025, 8 सप्टेंबर 2025 आणि 11 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 17005 हैदराबाद – रक्सौल एक्स्प्रेस (via- रांची), 28 ऑगस्ट 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 17006 रक्सौल- हैदराबाद एक्स्प्रेस (via- रांची), 31 ऑगस्ट 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 07051 चर्लपल्ली – रक्सौल स्पेशल (via- रांची), 30 ऑगस्ट 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 07052 रक्सौल – चर्लपल्ली स्पेशल (via- रांची), 2 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 07005 चर्लपल्ली – रक्सौल स्पेशल (via- रांची), 1 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 07006 रक्सौल – चर्लपल्ली स्पेशल (via- रांची), 4 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 18310 जम्मू तवी – संबलपूर एक्स्प्रेस (via- रांची), 7 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 18309 संबलपूर- जम्मू तवी एक्स्प्रेस (via- रांची), 9 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 13425 मालदा टाऊन – सूरत एक्स्प्रेस (via- रांची), 6 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 13426 सूरत- मालदा टाऊन एक्स्प्रेस (via- रांची), 8 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 15028 गोरखपूर – संबलपूर एक्स्प्रेस, 8 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.
  • ट्रेन क्रमांक 15027 संबलपूर- गोरखपूर एक्स्प्रेस, 9 सप्टेंबर 2025 रोजी रद्द असेल.

या गाड्या अर्ध्या रस्त्याने रद्द

  • ट्रेन क्रमांक 15028 गोरखपूर – संबलपूर एक्स्प्रेस, 23 ऑगस्ट 2025, 25 ऑगस्ट 2025, 27 ऑगस्ट 2025, 29 ऑगस्ट 2025 आणि 31 ऑगस्ट 2025 रोजी हटिया स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. हटिया ते संबलपूरदरम्यान ही ट्रेन शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.
  • ट्रेन क्रमांक 15027 संबलपूर – गोरखपूर एक्स्प्रेस, 24 ऑगस्ट 2025, 26 ऑगस्ट 2025, 28 ऑगस्ट 2025, 30 ऑगस्ट 2025 आणि 1 सप्टेंबर 2025 रोजी हटिया स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. ही ट्रेन संबलपूर ते हटियादरम्यान शॉर्ट टर्मिनेट असेल.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.