AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवाशांची तक्रार, ठेकेदारांना 5.60 कोटी रुपये दंड, काय, काय होती तक्रार?

Indian Railways Fines contractor: रेल्वेच्या सेकंड एसीमधून एक महिला प्रवासी प्रवास करत होती. त्यावेळी तिला मिळालेले बेडरोल खराब होते. त्याबाबत तिने अटेंडेंटकडे तक्रार केली. त्या तक्रारीनंतरही त्याने बेडरोल बदलून दिला नाही. मग तिने रेल मददमध्ये तक्रार केली. त्यानंतर त्या ठेकेदारास त्वरीत दंड करण्यात आला.

रेल्वे प्रवाशांची तक्रार, ठेकेदारांना 5.60 कोटी रुपये दंड, काय, काय होती तक्रार?
RailMadad
| Updated on: Nov 22, 2024 | 4:06 PM
Share

Indian Railways Fines contractor: भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयी, सुविधांची काळजी घेतली जाते. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांकडे लक्ष न देणाऱ्या ठेकेदारांना दंड करणे सुरु केले आहे. रेल्वेला एकूण 5.60 कोटी रुपये दंड मिळणार आहे. भारतीय रेल्वेकडून होणाऱ्या या धडक कारवाईमुळे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये दिवसंदिवस सुधारणा होत आहे.

असा झाला दंड

ट्रेनमध्ये प्रवास करताना खराब जेवण, कोच टॉयलेटमध्ये घाण असणे, पाणी नसणे, खराब मोबाइल चार्जिंग, खराब बेडरोल, खराब एसी, खराब लाईट अशा तक्रारी प्रवाशांकडून येत आहे. त्यानंतर भारतीय रेल्वेकडून ठेकेदारांवर कारवाई केली जात आहे. प्रवाशांनी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ टाकले आहे. तसेच रेल मदद या बेबसाईट आणि अँपवर तक्रारी केल्या आहे. त्या तक्रारींची दखल घेत रेल्वेने ठेकेदारांना 4 कोटी 40 लाख रुपये दंड करण्यात आला. तसेच एक कोटी रुपयांचा दंड ऑनबोर्ड हाउस कीपिंग करणाऱ्या ठेकेदारांना केला गेला आहे. म्हणजेच मागील सहा महिन्यात ठेकेदारांना एकूण 5.60 कोटी रुपये दंड केला आहे.

रेल्वेकडून त्वरित कारवाई

रेल्वेच्या सेकंड एसीमधून एक महिला प्रवासी प्रवास करत होती. त्यावेळी तिला मिळालेले बेडरोल खराब होते. त्याबाबत तिने अटेंडेंटकडे तक्रार केली. त्या तक्रारीनंतरही त्याने बेडरोल बदलून दिला नाही. मग तिने रेल मददमध्ये तक्रार केली. त्यानंतर त्या ठेकेदारास त्वरीत दंड करण्यात आला.

कॅटरिंग शिवाय ट्रेनमध्ये कोच किंवा टॉयलेट घाण असणे, खराब स्विच, खराब एसी, स्टेशनवरील लिफ्ट खराब असणे, एस्केलेटर, लाइट खराब याबाबत ठेकेदारांना 10,000 ते 20,000 रुपये दंड केला जातो. रेल्वे प्रवासी त्यासंदर्भातील तक्रार नोंदवली किंवा फोटो शेअर केले तर रेल्वे अधिकारी ठेकेदारास दंड करतात. तसेच वारंवार एकच तक्रार आली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला जातो. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी तक्रार आल्यावर त्वरित कारवाई करत असतात.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.