AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्थ एक मग रेल्वे दोन बेडशिट्स का देते ? किती दिवसांनी धुतला जातो बेडरोल, धक्कादायक माहिती

अलिकडेच रेल्वेने माहितीच्या अधिकारात रेल्वेच्या एसी कोचचे प्रवासी किती बेडरोलच्या वस्तू चोरी करुन नेतात याची आकडेवारी जाहीर केली होती. मात्र, ब्लँकेट आणि बेडरोल नेमका किती दिवसांनी धुतला जातो हे माहिती आहे का ?

बर्थ एक मग रेल्वे दोन बेडशिट्स का देते ? किती दिवसांनी धुतला जातो बेडरोल, धक्कादायक माहिती
Indian Railway - bedroll
| Updated on: Jul 26, 2026 | 4:57 PM
Share

Indian Railway : भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटीहून अधिक लोक प्रवास करतात. रेल्वेने लांबचा प्रवास आरामदायी आणि कमी वेळेत पूर्ण होत असतो. जगात भारतीय रेल्वे सर्वात कमी पैशात प्रवास घडवते. एसी कोचमध्ये रात्रीचा प्रवास करणाऱ्यांना रेल्वे बेडरोलची सुविधा देत असते. प्रत्येक बेडरोलमध्ये दोन चादर,उशा,ब्लँकेट, टॉवेल असतो. एक बर्थसाठी रेल्वे दोन बेडशीट्स पुरवत असते. काही प्रवासी ती बेडशिट अंगावर पांघरतात किंवा बर्थवर अंथरतात. परंतू या दोन बेडशिट चादरी देण्यामागचा उद्देश्य नेमका काय यासंदर्भात रेल्वेने माहिती दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने संसदेत दिलेल्या उत्तरात बेडरोलमध्ये दोन बेडशिट देण्याच्या मागचा उद्देश्य आणि त्याची धुलाई आणि रिप्लेसमेंटची माहिती रेल्वेने दिली आहे. रेल्वेच्या मते बेडरोलमध्ये मिळणाऱ्या दोन बेडशिट्स पैकी एक बेडशिट्स ( बर्थ ) आसनावर अंथरण्यासाठी दिलेली असते. तर दुसरी बेडशिट्सचा वापर ब्लँकेट सोबत पांघरुन घेण्यासाठी दिलेले असते. म्हणजे ब्लँकेटचा थेट त्वचेशी संपर्क येऊ नये.

किती दिवसांनी धुतात

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ब्लँकेट प्रत्येक वापरानंतर धुतला जात नाही. यामुळे प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी एक्स्ट्रा बेडशिट्स दिली जाते. त्यामुळे ब्लँकेटचा थेट संपर्क त्वचेशी येऊ नये अशी रेल्वेची योजना असते. आता रेल्वे यात बदल करत आहे. नॉर्थ वेस्ट रेल्वेने काही ट्रेनमध्ये आणि कामाख्या पर्यंत धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसमध्ये स्लीपर ट्रेनमध्ये ब्लॅकेटला कव्हर सोबत देण्याची योजना आखली आहे. लोकरीच्या ब्लँकेटला कव्हर लावल्याने एक्स्ट्रा चादर देण्याची गरज राहात नाही. रेल्वेने बेडरोलला किती वेळा धुतले जाते याची देखील माहिती दिली आहे.

किती वेळा धुतले जाते बेडशिट्स

बेडशिट्स, उशाचे कव्हर, टॉवेलला प्रत्येक वापरानंतर धुतले जाते.

ब्लँकेटला महिन्यातून एक ते दोन वेळा धुतले जाते.

रेल्वेच्या नियमानुसार सुती बेडशिट्सला एक वर्षांनंतर हटवले जाते.

पॉलिएस्टर बेडशीटचे आयुष्य दोन वर्षांचे असते.

उशांचे कव्हर, फेस टॉवेलची आयुर्मान ९ महिन्यांचे असते.

तर उशा आणि ब्लँकेटला दोन वर्षांनी बदलले जाते.

एसी कोचच्या प्रवाशांनी ४६.५४ लाख टॉवेल चोरले…

ट्रेनमध्ये बेडरोल चोरीने रेल्वेचे कोट्यवधीचे नुकसान होत असते. जानेवारी २०२२ ते मे २०२६ दरम्यान १.२७ कोटी रुपयांची बेडरोलची चोरी झालेली आहे. यात टॉवेलचा सर्वाधिक प्रवासी चोरी करत असतात असे उघडकीस आले आहे. या चोरीमुळे कंत्राटदारांना १०४.५१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक चोरीत ४६.५४ लाख फेस टॉवेल, ४१.१३ लाख बेडशिट्स, २३.५९ लाख उशांचे कव्हर, १२.९५ लाख ब्लँकेट चोरी झाले आहेत. यात २.७६ लाख उशा चोरी झाल्या आहेत.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम