AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा स्टार वॉरमध्ये प्रवेश, लेझर बीमने आकाशातील विमान पाडले, DRDO ने तयार केले अनोखे ब्रह्मास्र

या आधी लेझरने विमान पाडण्याचा प्रयोग अमेरिका, रशिया आणि चीन यांनी केला आहे. इस्रायल देखील अशाच प्रकल्पावर काम करीत आहे. भारताला यात यश मिळाल्याने भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे.

भारताचा स्टार वॉरमध्ये प्रवेश, लेझर बीमने आकाशातील विमान पाडले, DRDO ने तयार केले अनोखे ब्रह्मास्र
Laser based weapon
| Updated on: Apr 13, 2025 | 6:46 PM
Share

भारताच्या डीआरडीओने एक अमोघ असे अस्रं तयार केले आहे. या अस्राने शत्रूची विमाने क्षेपणास्रं,ड्रोन हवेतल्या हवेतच नष्ट करणे शक्य होणार आहे. यामुळे देशाची संरक्षण सिद्धता वाढणार आहे.या प्रकारचे तंत्रज्ञान मिळविणारा भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा तिसरा देश आहे. या नव्या शस्राची चाचणी डीआरडीओने अलिकडेच घेतली आहे. भारतीय डीआरडीओच्या या नव्या ३० किलोवॅट क्षमतेच्या लेसर-आधारित शस्त्र प्रणालीचा वापर करून स्थिर-विंग असलेली विमाने, क्षेपणास्त्रे आणि  ग्रुप  ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट करता येणार आहेत, त्यामुळे देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

भारत चौथ्या क्रमांकांचा देश

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) हे लेझर आधारित शस्त्र (DEW) विकसित केले आहे, जे आता लष्करातील वापरासाठी उत्पादित आणि तैनातीसाठी सज्ज होणार आहे. या डीआरडीओच्या या कामगिरीने भारत अमेरिका, चीन आणि रशियासह प्रगत लेसर शस्त्र क्षमता असलेल्या देशांच्या उच्चभ्रू गटात भारताचा समावेश झाला आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

 स्टार वॉर्स क्षमता मिळणार..

या प्रयोगशाळेने इतर डीआरडीओ प्रयोगशाळा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी साधलेला समन्वय साधून हे शस्र तयार केले आहे.ही तर प्रवासाची सुरुवात आहे. मला खात्री आहे की आपण लवकरच आपले ध्येय गाठू. आता आम्ही उच्च ऊर्जा मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स सारख्या इतर उच्च ऊर्जा प्रणालींवर देखील काम करीत आहोत. आम्ही अशा अनेक तंत्रज्ञानावर काम करीत आहोत ज्यामुळे आपल्याला स्टार वॉर्स क्षमता मिळेल. आज तुम्ही जे पाहिले ते स्टार वॉर्स तंत्रज्ञानाच्या घटकांपैकी एक होते असे डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी म्हटले आहे. “माझ्या माहितीनुसार, अमेरिका, रशिया आणि चीनने याआधी ही क्षमता दाखवली आहे. इस्रायल देखील अशाच क्षमतांवर काम करीत आहे, मी म्हणेन की ही प्रणाली दाखवणारा भारत जगातील चौथा किंवा पाचवा देश आहे,असेही कामत यांनी म्हटले आहे.

उपग्रह सिग्नल जॅम करण्याची ताकद

३० किलोवॅट क्षमतेची ही लेसर शस्र प्रणाली ५ किलोमीटरच्या परिसरात ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई हल्ल्यांच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डिझाईन केली आहे. या प्रणातील अत्यंत प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आहेत, ज्यामध्ये संप्रेषण आणि उपग्रह सिग्नल जॅम करण्याची देखील ताकद आहे.अचूक लक्ष्य वेध करण्यासाठी ही प्रणाली ३६०-डिग्री इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड (EO/IR) सेन्सरने सुसज्ज आहे आणि ती हवाई, रेल्वे, रस्ते किंवा समुद्राद्वारे वेगाने कुठेही नेऊन तैनात केली जाऊ शकते.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.