AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या राज्यातून सुरु होणार भारताचे पहिले ऑनलाईन कोर्ट, 24 तास होणार सुनावणी

भारताचे पहिले ऑनलाईन कोर्ट केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यात सुरु झालेले आहे. देशातील पहिल्या ऑनलाईन कोर्टाने काम करणे देखील सुरु केलेले आहे. हे कोर्ट दिवसाचे २४ तास चालणार आहे. या महिन्याच्या २० तारखेपासून ऑनलाईन याचिकांच्या सुनावणी देखील सुरु होणार आहे.

या राज्यातून सुरु होणार भारताचे पहिले ऑनलाईन कोर्ट, 24 तास होणार सुनावणी
court
| Updated on: Nov 19, 2024 | 2:37 PM
Share

देशातील कोर्टात अनेक केसेस सुनावणी अभावी पेंडीग असल्याने न्याय मिळण्यास विलंब होत आहे. अशात देशातील केरळ राज्यातीर कोल्लम येथे देशातील पहिले ऑनलाईन कोर्ट सुरु झालेले आहे. बुधवार २० नोव्हेंबरपासून या ऑनलाईन कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे. या कोर्टाची सुनावणी २४ तास सुरु राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या कोर्टात एक मजिस्ट्रेट आणि तीन कर्मचारी असणार आहेत. या कोर्टात कुठूनही ऑनलाईन केस दाखल करता येणार आहे. कोर्टाच्या वेबसाईटवर निर्धारित प्रपत्र भरुन ऑनलाईन केस दाखल करता येणार आहे.विशेष म्हणजे सेटलमेंट कायद्यानुसार येथे चेक बाऊन्सची प्रकरणे देखील चालविली जाणार आहेत.या संदर्भात कोल्लम बार असोसिएशन हॉलमध्ये वकील आणि क्लार्कना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

कोर्टाच्या इमारतीतील जनरल कोर्टात होणारी कोणतीही पारंपारिक प्रक्रीया होणार नाही. याचिका दाखल करणाऱ्यांना तसेच वकीला स्वत: कोर्टात हजर राहण्याची गरज राहणार नाही. वकीलांचा युक्तीवाद, साक्षीदारांचा जबाब आणि सुनावणी संपूर्ण प्रक्रीया ऑनलाईन होणार आहे. पोलिस ठाण्यांना ऑनलाईन पत्र पाठवले जाणार आहे. आरोपी आणि केस दाखल करणाऱ्यांना दोन्ही पक्षांना ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.

अन्य जिल्ह्यातही ऑनलाईन कोर्ट सुरु होणार

ऑनलाईन कोर्टात अपलोड केलेल्या दस्ताऐवजांचा वापर करुन जामीन देखील मिळविता येऊ शकणार आहे. कोर्टात फि देखील ऑनलाईन भरावी लागणार आहे. येथे याचिका दाखल करणाऱ्यांना आणि वकीलांना कोर्टाच्या कामात थेट सहभाग घेता येईल अशी प्रोसेस तयार केली आहे. हे डिजिटल कोर्ट या महिन्याच्या २० तारखेपासून कोल्लम जिल्ह्यातील चार न्यायालयात या प्रकारे प्रकरणांची सुनावणी करणार आहे. या डिजिटल कोर्टाची कार्यप्रणाली पाहून अन्य जिल्ह्यात देखील अशाच प्रकारचे ऑनलाईन कोर्ट सुरु होणार आहे.

हायकोर्टाच्या ऑडिटोरियममध्ये उद्घाटन

या ऑनलाईन कोर्टाचे उद्घाटन या वर्षी 17 ऑगस्ट रोजी हायकोर्टाच्या ऑडिटोरियम मध्ये केले होते. या समारंभात मुख्यमंत्री पिनाराई विजयन सामील झाले होते.या कायक्रमाचे उद्घाटन करताना सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी केरळ राज्याच्या या योजनेचे कौतूक केले होते.ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने कोविड साथीत लॉकडाऊनमध्ये ४८ तासांत ऑनलाईन सुनावणी सुरु केली होती. या तंत्रज्ञानाने लाखो भारतीय नागरिकांना मदत होणार आहे.

तंत्रज्ञान नागरिकांच्या मदतीला येईल

सर्वोच्च न्यायालयात जाऊ न शकल्याने कोणावरही न्यायापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये. तंत्रज्ञानाचा वापर करुन देशातील कोणत्याही कोपऱ्यातून लोकांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते. मला आशा आहे की हे तंत्रज्ञान अनेक लोकांच्या मदतीला येईल.यामुळे आपल्या सर्वांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाच्या स्वप्न सत्यात येण्यात मदत मिळणार असल्याचे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी त्यावेळी म्हटले होते.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी