भारताचा आणखी एका मुस्लीम देशासोबत महत्त्वाचा करार, पाकिस्तानला मोठा झटका

भारताने गेल्या काही वर्षात अनेक देशांसोबत व्यापार वाढवला आहे. भारताने परदेशी गुंतवणूक देशात आणण्यासाठी देखील मोठी मजल मारली आहे. भारत अनेक गोष्टींचा सर्वात मोठा आयात करणारा देश आहे. त्यातच भारताने आणखी एका मुस्लीम देशासोबत करार करण्यासाठी महत्त्वाची पाऊलं उचलली आहेत.

भारताचा आणखी एका मुस्लीम देशासोबत महत्त्वाचा करार, पाकिस्तानला मोठा झटका
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 5:24 PM

India-Oman Trade : भारताने गेल्या काही वर्षात अनेक देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. ज्यामध्ये मध्य पूर्वेतील देशांचा देखील समावेश आहे. वाढत्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे अनेक देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे व्यापाराला मोठा धोका निर्माण झाला आहे. असे असताना देखील भारताने मात्र आणखी एका मुस्लीम देशासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला आहे. भारताने यूईए सह अनेक मुस्लीम देशांंसोबत चांगले चांगले व्यापारी संबंध आहे. त्यातच भारताने आता ओमानसोबत नवा करार केला आहे. भारताचा इराण सोबत तेलाचा व्यापरा आहे. पण ओमान हे भारत आणि इराणमधील होर्मुझच्या सामुद्रधुनीचे प्रवेशद्वार आहे, जे जागतिक तेलाच्या वाहतुकीसाठी एक प्रमुख प्रवेशद्वार आहे.

सध्या भारतात लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने कोणताही व्यापार करारावर होऊ शकत नाही. मात्र मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास लवकरच ओमानसोबत व्यापार करार होईल, असे संकेत दिले आहेत. भारत ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या (GCC) सदस्यांसोबत व्यापार वाढवत आहे.

ओमानकडून भारताला सवलत

ओमानसोबतच्या नियोजित करारामुळे पाकिस्तान आणि चीनला मोठा झटका लागणार आहे. ओमानने कृषी उत्पादने, रत्ने आणि दागिने, चामडे, ऑटोमोबाईल्स, वैद्यकीय उपकरणे, अभियांत्रिकी उत्पादने आणि कापड यासह वार्षिक $3 अब्ज किमतीच्या भारतीय निर्यातीवरील आयात शुल्क माफ करण्याचे मान्य केले आहे. ओमानमधून काही पेट्रोकेमिकल्स, ॲल्युमिनियम आणि तांबे यांच्यावरील आयात शुल्क कमी करण्यास भारताने सहमती दर्शवली आहे.

भारत आणि ओमानमधील व्यापार गेल्या वर्षी वाढला जेव्हा ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक हे भारत भेटीवर आले होते. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक झाली. यावेळी १० क्षेत्रांमध्ये भारतासोबत व्यापारावर चर्चा झाली.

भारत-ओमान जुने संबंध

भारत आणि ओमान यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांवर आधारित दीर्घकालीन मैत्री आहे. भारत आणि ओमानमधील लोकांचा संपर्क सुमारे 5,000 वर्षे जुना आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध 1955 मध्ये प्रस्थापित झाले आणि 2008 मध्ये ते धोरणात्मक भागीदारीत श्रेणीसुधारित झाले.

गाझामधील हमास विरुद्ध इस्रायल युद्धामुळे अनेक मुस्लीम देश इस्रायलविरोधात एकत्र आले आहेत. इराणने देखील इस्रायलसोबत शत्रुत्व घेतले आहे. इराणने लाल समुद्रात वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. यामुळे जागतिक शिपिंग विस्कळीत झाली आहे आणि जहाजांना लाल समुद्राचा मार्ग टाळण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे जहाजांना आफ्रिकेतून लांबच्या सागरी मार्गाने व्यापार करावा लागत आहे. ओमानसोबतचा व्यापार करार भविष्यात भारतासाठी नवीन व्यापारी मार्ग उघडू शकतो.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.