
अमेरिका भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसत नाहीये, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा परिणाम हा जीडीपीवर होऊ शकतो, त्याचा निर्यातीला फटका बसू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होता. मात्र आता हा अंदाज आता साफ चुकीचा ठरताना दिसत आहे, भारताच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत भारताच्या निर्यातीमध्ये दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे, दरम्यान अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा फटका हा भारताला बसू नये, यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असून, अमेरिकेला पर्याय उभा केला जात आहे. याचा एक भाग म्हणून आता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाकडे एक मास्टरस्ट्रोक म्हणून पहाण्यात येत आहे.
लवकरच भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी व्यापारी डील होण्याची शक्यता आहे. ही व्यापारी डील झाल्यास अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करण्याची शक्यता आहे. टॅरिफ कमी झाल्यास निर्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्याचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. दरम्यान अमेरिकेसोबत डील संदर्भात बोलणं सुरू असतानाच आता भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेला पर्याय म्हणून आणि बाजारातील व्यापारी स्पर्धा टिकून ठेवण्यासाठी तसेच इतर देशांसोबत संबंध मजबूत करण्यासाठी भारतानं हा निर्णय घेतला आहे. भारताचा चीनसोबत डोकलाम मुद्द्यावर मोठा वाद झाला होता, त्यानंतर आता भारत आणि चीनमधील जवळीक वाढताना दिसत आहे. चीनसोबत जवळीक वाढवण्यासाठी भारतानं मोठा निर्णय घेतला आहे.
भारतानं चीनी पर्यटकांसाठी आता आपली कवाड खुली केली आहेत, भारताच्या नव्या धोरणामुळे आता जगभरातील चीनी नागरिकांना भारतीय दुतावासाच्या माध्यमातून पर्यटक व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे. यावर्षी जुलाई महिन्यात भारतानं चीनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा एकदा जारी केला आहे. जुलै 2020 मध्ये पूर्व लडाख आणि एलएसीवर निर्माण झालेल्या तणावामुळे भारत आणि चीनमध्ये संबंध ताणले गेले होते, भारतानं चीनी नागरिकांसाठी असलेली ही सुविधा त्यावेळी बंद केली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान हा आता अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण चीन व भारत जवळ येऊ नये अशी अमेरिकेची इच्छा आहे, मात्र भारतानं घेतलेल्या या निर्णयामुळे आता चीन आणि भारताचे संबंध अधिक मजबूत होणार आहेत.