AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या काळात भारताच्या रणनीतीने जग हैराण, टीव्ही 9 समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'या समिटमध्ये जागतिक संघर्षावर भारताची रणनिती सांगितली. आज जग ज्या स्थितीतून जात आहे ती खूप गंभीर आहे. हे जग संघर्षाने त्रस्त असताना आणि संपूर्ण जगावर त्याची सावली असताना अशात 'India and the World' वर बोलणे प्रासंगिक आहे.

युद्धाच्या काळात भारताच्या रणनीतीने जग हैराण, टीव्ही 9 समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य
PM MODI
| Updated on: Mar 23, 2026 | 10:21 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्क ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट (WITT) 2026’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य पूर्वेतील संघर्षावर टिप्पणी केली. पंतप्रधान म्हणाले की जगात 28 फेब्रुवारी पासून मोठा संघर्ष सुरु आहे. भारत प्रगती आणि विकासाच्या संकल्पासह पुढे जात आहे. भारताने आपले निर्णय आणि संकटांचा निपटारा करण्याची क्षमता दाखवली आहे. जगाची विभागणी दोन भागात झाली आहे. भारताने अभूतपूर्व मैत्रीचे पुल बांधले आहेत. ग्लोबल साऊथ पासून शेजारील देशांपर्यंत भारत सर्वांचा विश्वासू पार्टनर आहे.

पंतप्रधान म्हणाले की काही लोक विचारतात की आम्ही कोणच्या सोबत आहोत. त्यांना हे उत्तर आहे की आम्ही भारता सोबत आहोत. भारताच्या हितांसोबत आहोत. शांतता आणि संवादाच्यासोबत आहोत असेही पंतप्रधान म्हणाले.

भारत आव्हानांचा सामना करतो – पी.एम. मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की आज आम्ही भारत आणि जगाच्या संदर्भात चर्चा करत आहोत. आज जग संघर्षामुळे अडकले आहे. जेव्हा या संघर्षाचे दुष्परिणाम देखील दिसत आहेत. भारत आणि जगा संदर्भात बोलणे खूपच प्रासंगिक आहे. साल 2014 च्या आधीच्या स्थितीला सोडून भारत एक नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत आव्हानांना टाळत नाही. त्या आव्हानांशी टक्कर घेतो असेही त्यांनी सांगितले.

ते यावेळी म्हणाले की कोरोना साथीच्या नंतर आलेली आव्हाने एकामागोमाग वाढली. असे कोणतेही वर्ष नाही ज्याने भारत आणि भारतीयांची परीक्षा घेतली नाही. परंतू १४० कोटी भारतीयांच्या एकजूट प्रयत्नांनी भारताने प्रत्येक संकटाचा सामना करत पुढे जात आहे. या वेळी युद्धाची परिस्थितीत भारताची निती आणि रणनिती पाहून भारताचे सामर्थ्य पाहून जगाचे अनेक देश हैराण आहेत.

कोणताही देश युद्धाच्या परिणामापासून वाचू शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की जगात जेथे युद्ध सुरु आहे. ते भारताच्या सीमेपासून दूर आहे. आजच्या काळात कोणताही देश युद्धाच्या दुष्परिणामापासून दूर राहील हे होऊ शकत नाही. अनेक देशात स्थिती गंभीर झाली आहे, राजकीय स्वार्थाने भरलेले काही पक्ष संकटाच्या या घडीतही आपली रायकीय संधी शोधत आहेत. हा वेळ संयमाचा आहे. संवेदनशीलतेचा आहे.

पीएम मोदी म्हणाले की कोरोना साथीत पाहिले की देशवासी संयमाने सामना करतात ते कसे परिणान येतात. जगातील अनेक उलाढालीतही भारताने आपली प्रगतीच्या गतीला कायम ठेवले आहे.

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...