AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indigo : इंडिगोने दिव्यांगांना फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले, लोक झाले संतप्त तर मंत्री म्हणाले, कारवाई होईल

त्या तरूणाच्या वागण्यामुळे त्यांना त्या फ्लाइटमध्ये चढू देणे योग्य होणार नाही असे वाटले. त्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या किशोरवयीन मुलाला इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याचा निर्णय इंडिगोने घेतला.

Indigo : इंडिगोने दिव्यांगांना फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले, लोक झाले संतप्त तर मंत्री म्हणाले, कारवाई होईल
इंडिगोImage Credit source: tv9
| Updated on: May 09, 2022 | 4:54 PM
Share

नवी दिल्ली : रांची विमानतळावर (Ranchi Airport) एका अपंग तरुणाशी भेदभाव केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia) देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी त्या अपंग तरूणाच्या तक्रारीच्या ट्विटची दखल घेत आपण स्वतः या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले. दरम्यान ही बाब फेसबुक आणि ट्विटरवर अनेकांनी शेअर केली आहे. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी किशोरला फ्लाइटमध्ये चढू दिले नाही, असा आरोप आहे. हे मूल इतर प्रवाशांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. विमान रांचीहून हैदराबादला (Hyderabad) जात होते. ट्विटनुसार – हे संपूर्ण प्रकरण विमानतळावर सुमारे 45 मिनिटे सुरू होते. खरंतर अभिनंदन मिश्रा नावाच्या एका ट्विटर यूजरने 8 मे रोजी एक ट्विट केले  होते, त्यांच्या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते, ‘काल इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी रांची विमानतळावर हे केले, इंडिगो तुम्हाला लाज वाटली पाहिजे’. या ट्विटमध्ये त्याने ज्योतिरादित्य सिंधिया, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि पीएमओ यांना टॅग केले. अभिनंदन याने आपल्या ट्विटमध्ये असेही लिहिले की, या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

इंडिगोचे स्पष्टीकरण

ट्विटमध्ये युजरने संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे सांगितले आहे. त्याचवेळी इंडिगोने याप्रकरणी खंत व्यक्त केली. तसेच या प्रकरणी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेत त्यांनी हा प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. मात्र हे सर्व नियमानुसार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला इंडिगोला कंपनीला त्या तरूणाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना फ्लाइटमध्ये घेऊन जायचे होते, पण नंतर त्या तरूणाच्या वागण्यामुळे त्यांना त्या फ्लाइटमध्ये चढू देणे योग्य होणार नाही असे वाटले. त्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या किशोरवयीन मुलाला इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याचा निर्णय इंडिगोने घेतला.

योग्य ती कारवाई केली जाईल

याप्रकरणी ज्योतिरादित्य सिंधिया त्या अपंग तरूणाच्या तक्रारीच्या ट्विटची दखल घेत आपण स्वतः या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले. तसेच ट्विटरवर लिहिले की, ‘अशा वृत्तीला शून्य सहनशीलता आहे. कोणत्याही माणसाने यातून जाऊ नये! मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करत असून, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोकडूनही अहवाल मागवला आहे. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

इंडिगोवर काय आरोप होते?

तक्रारीनुसार, दिव्यांग किशोरला रांची विमानतळावर इंडिगो कर्मचाऱ्यांच्या कथित अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. आई-वडिलांसोबत तो कारने विमानतळावर पोहोचला. कारमधून उतरल्यानंतर त्याने त्याच्या पालकांसह त्याची सुरक्षा तपासणी केली. ट्विटनुसार, तो भुकेलेला आणि तहानलेला, गोंधळलेला आणि घाबरलेला दिसत होता.

हे सर्व पाहून इंडिगोचे तीन कर्मचारी आले आणि त्यांनी सांगितले की जर तो (किशोर) नॉर्मल झाला नाही तर त्याला फ्लाइटमध्ये चढू दिले जाणार नाही. यानंतर आईने किशोरला ज्यूस दिला, औषधे दिली, त्यानंतर तो नॉर्मल झाला. तोपर्यंत उड्डाणाची वेळ झाली होती. दरम्यान या तरूणाने आपले जेवणही केले होते. पण त्यानंतर इंडिगोच्या एका कर्मचार्‍यांने सांगितले की, ते या मुलाला फ्लाइटमध्ये चढू देऊ शकत नाहीत कारण ते इतर प्रवाशांसाठी धोकादायक आहे. यावेळी इतर प्रवासीही जमा झाले आणि त्यांनी किशोरसोबत कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. इंडिगोचे व्यवस्थापक सतत ओरडत होते की हे मूल नियंत्रणाबाहेर आहे आणि तो घाबरलेल्या अवस्थेत आहे.

ट्वीटरवर अभिनंदनने दिलेल्या माहितीनुसार, हा किशोर त्याच्या व्हीलचेअरवर अगदी आरामात बसला होता. यादरम्यान, इतर प्रवाशांनीही इंडिगोच्या कर्मचार्‍यांची सतत उलटतपासणी केली की मुलाला प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे का. पण इंडिगोचे कर्मचारी काहीही ऐकायला तयार नव्हते. एका युजरच्या म्हणण्यानुसार, तो आणि त्याचे पालक तिथेच राहिले. तर सुरक्षा रक्षकाने बोर्डिंग गेटही बंद केले होते.

विमानतळ संचालक केएल अग्रवाल

विमानतळ संचालक केएल अग्रवाल यांनी आज तकला फोनवर सांगितले की, हा प्रवासी आणि विमान कंपनीचा प्रश्न आहे, परंतु त्यांना मिळालेली माहिती अशी होती की तो घाबरत होता. आणि आश्वासन देऊनही शांत होत नव्हता. बोर्डिंग गेटसमोर आई चिडली आणि मुलाला बेदम मारहाण केली. यानंतर विमान कंपनीने त्या दिवशी मुलाला न पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, रविवारी कुटुंबीयांना त्यांच्या इच्छितस्थळी रवाना करण्यात आले.

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.