आजी, तू तर सगळेच पेरु खाल्लेस, नातीची थट्टा झोंबली, आजी थेट अॅसिड प्यायली!

पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या एका छोट्याश्या गोष्टीने ही आजी इतकी दु:खी झाली की तिने हे टोकाचं पाऊल उचललं

आजी, तू तर सगळेच पेरु खाल्लेस, नातीची थट्टा झोंबली, आजी थेट अॅसिड प्यायली!

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक हृद्यद्रावक घटना घडली आहे (Grandmother Drink Acid). या घटनेने सर्वच हळहळले आहेत. येथील एका 60 वर्षीय वृद्ध महिलेने अ‍ॅसिड प्राशन केलं आहे. अ‍ॅसिड प्राशन केल्याने वृद्ध महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, उपाचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या एका छोट्याशा गोष्टीने ही आजी इतकी दु:खी झाली की तिने हे टोकाचं पाऊल उचललं (Grandmother Drink Acid).

‘तुम्ही सर्व पेरु खाल्ले’

पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीने आजीला म्हटलं की, “तुम्ही तर झाडावर लागलेले सगळेच पेरु खाल्ले”. नातीच्या या वक्तव्याने आजी अत्यंत दु:खी झाली आणि तिने रागाच्या भरात अ‍ॅसिड प्राशन केलं. याप्रकरणी जिल्ह्यातील बेटमा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

‘इतकी लहान असून टोमणे मारते’

मृत वृद्ध महिलेच्या मुलाने सांगितलं की, “माझी मुलगी तिच्या आजीसोबत बसली होती. माझ्या मुलीने आईची थट्टा करत म्हटलं की तुम्ही तर सगळे पेरु खाल्ले. यावर आई रागावली आणि म्हणाली की मी एकटीने सर्व पेरु नाही खाल्ले. तू इतकी लहान असून मला टोमणा मारते.”

पोलिसांकडून तपास सुरु

बेटमा चौकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव मीराबाई असून त्या 60 वर्षांच्या होत्या. बेटमा पोलीस स्टेशन हद्दीतील मंत्री नगर येथे त्या त्यांच्या कुटुंबासोबत राहायच्या. या आजीला त्यांच्या पाच वर्षीय नातीने तुम्ही सर्व पेरु खाल्ले असं म्हटलं. त्यामुळे रागावलेल्या आजीने अ‍ॅसिड प्राशन केलं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Grandmother Drink Acid

संबंधित बातम्या :

आधी आदिवासी मुलीवर बलात्कार, तीन महिन्यांनी जामिनावर सुटल्यावर विधवेवर बलात्कार, मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना

मध्य प्रदेशात 300 कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचं संकट, अलर्ट जारी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI