मध्य प्रदेशात 300 कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचं संकट, अलर्ट जारी

कोणत्याही परिस्थितीत कावळे आणि पक्षी यांच्या मृत्यूवर त्वरित रोग नियंत्रणासाठी भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांना जागरुक राहण्याची आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशात 300 कावळ्यांचा मृत्यू, बर्ड फ्लूचं संकट, अलर्ट जारी
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 8:58 PM

भोपाळ : एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना आता दुसरीकडे पक्षांमधील एका संसर्गाबद्दल सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश पशुसंवर्धन मंत्री प्रेमसिंह पटेल यांच्या सूचनेवरून राज्यात कावळ्यांच्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कावळे आणि पक्षी यांच्या मृत्यूवर त्वरित रोग नियंत्रणासाठी भारत सरकारने दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांना जागरुक राहण्याची आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (bird flu alert in madhya pradesh more than 300 crows die in the state)

मिळालेल्या माहितीनुसार, बर्ड फ्ल्यूमुळे राज्यात, गेल्या वर्षी 23 डिसेंबरपासून 3 जानेवारी 2020 पर्यंत इंदूरमध्ये 142, मंदसौरमध्ये 100, आगर-मालवामध्ये 112, खरगोन जिल्ह्यात 13, सीहोरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पक्षांच्या या मृत्यूमुळे चिंता व्यक्त करत भोपाळ राज्य डीआयमध्ये मृत कावळ्यांचे नमूने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यासाठी इंदूरमध्ये कंट्रोल रूम स्थापित करून रॅपिड रिस्पॉन्स टीमकडूनही कारवाई केली जात आहे.

पोल्ट्री आणि स्थलांतरित पक्ष्यांचं विशेष निरीक्षण

कावळ्यांचा मृत्यू होताच जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासनाने त्वरित नियंत्रण व शमन कार्यवाही करून अहवाल संचालनालयाला पाठवण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कुक्कुटपालन व कुक्कुट उत्पादन बाजार, शेत, जलाशय आणि स्थलांतरित पक्ष्यांवर विशेष लक्ष ठेवणं, स्थलांतरित पक्ष्यांचे नमुने गोळा करून भोपाळ प्रयोगशाळेत पाठवण्यासाठीही सांगण्यात आलं आहे.

बर्ड फ्लूची धोकादायक लक्षणं, पक्ष्यांवर लक्ष ठेवा

पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंबड्यांमध्ये एच 5 एन 8 हा विषाणू अद्याप कोंबडीमध्ये सापडला नाही. कोंबडीमध्ये आढळणारा विषाणू सहसा एच 5 एन 1 असतो. प्रेम पटेल यांनी नागरिकांना पक्ष्यांवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे. जर डोळे, मान आणि पक्ष्यांच्या डोक्याभोवती सूज येत असेल डोळ्यांमधून गळती, क्रेस्ट आणि पायात निळेपणा, अचानक अशक्तपणा, पंख पडणे, पक्ष्यांची चपळता, असामान्य आहार आणि अंडी नसणे, मृत्यूचे प्रमाण वाढल्यास सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही लक्षणं असल्यास लपवून ठेव नका, अन्यथा ते कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. (bird flu alert in madhya pradesh more than 300 crows die in the state)

संबंधित बातम्या – 

सरकारने सीरम लसीसाठी केली 6.6 कोटींची डील, 200 रुपयांना मिळणार एक डोस

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मी लस टोचणार नाही : शिवराज सिंह चौहान

(bird flu alert in madhya pradesh more than 300 crows die in the state)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.