AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालदीव ऐवजी या देशावर काढला भारतीयांनी राग, अखेर द्यावे लागले स्पष्टीकरण

india maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील मतभेदाचे परिणाम दुसऱ्याच देशाला भोगावे लागले आहेत. कारण मालदीव ऐवजी भारतीयांनी दुसऱ्याच देशावर आपला राग व्यक्त केला आहे. मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहेत.

मालदीव ऐवजी या देशावर काढला भारतीयांनी राग, अखेर द्यावे लागले स्पष्टीकरण
| Updated on: Feb 23, 2024 | 7:48 PM
Share

India maldive row : अनेकवेळा समान नावांमुळे गोंधळ उडतो. त्यामुळे एकचा राग कधी कधी दुसऱ्यावर देखील काढला जातो. असाच काहीसा प्रकार मॉरिशसच्या बाबतीत घडला आहे. मॉरिशस टुरिझमने भारतीय पर्यटकांना आपल्या देशात आमंत्रित करण्यासाठी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट लिहिली आहे. पण यावर प्रतिक्रिया अशा आल्या की कदाचित मॉरिशसलाही अपेक्षा नसेल. मालदीवला कंटाळलेल्या भारतीयांनी चुकून मॉरिशसला फटकारले. एकाने लिहिले की, तुम्ही आमचा आणि आमच्या पंतप्रधानांचा आदर करत नाही, म्हणून आम्हाला तुमच्या देशात येण्यात रस नाही. एकाने लिहिले की, आम्हाला आमच्याच देशात एक चांगला पर्याय सापडला आहे.

मॉरिशसच्या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया

मॉरिशस टुरिझम (इंडिया) ने सोशल मीडिया साइट X वर लिहिले की, मॉरिशस भारतीयांचे स्वागत करतो. 2024 मध्ये आमच्या बेटाची ऊर्जा अनुभवा. तुमच्यासाठी येथे हजारो साहसी गोष्टी आहेत, त्यामुळे आजच सुट्टीची योजना आखा. या पोस्टनंतरच कॉमेडी ऑफ एरर्स म्हणता येईल अशी मालिका सुरू झाली. भारतीयांनी भरपूर ट्विट केले. हा क्रम तेव्हा संपला जेव्हा मॉरिशस टुरिझमने पुन्हा लिहिले की, आम्ही मॉरिशस आहोत, मालदीव नाही.

भारत-मालदीवमध्ये तणाव

भारत आणि मालदीवमध्ये तणावाचे वातावरण आहे. मालदीवमध्ये नवीन सरकार आल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष हे चीन समर्थक आहेत. त्यामुळे ते भारतासोबत पंगा घेण्याचं साहस दाखवत आहेत. पण याच मालदीवला भारताने अनेक वेळा मोठी मदत केली आहे. दुसरीकडे मालदीव चीनकडून आणखी कर्ज घेत आहे. ज्याबाबत त्यांना आधीच सतर्क देखील करण्यात आले आहे.

लक्षद्वीप बेटाचा विकास होणार

मालदीवमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर त्यांची पदावरुन हकालपट्टी देखील करण्यात आली होती. पण या घटनेनंतर भारतीयांनी बॉयकॉट मालदीव सुरु केले होते. सोशल मीडियावरही ट्रेंड सुरु झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. भारतीय पर्यटक आता लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे भारत सरकारने लक्षद्वीप बेटाचा विकास करण्यासाठी बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात आली आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.