AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनिया गांधी अस्वस्थ, राहुल गांधी अनिच्छुक, G23 असंतुष्ट; पक्षांतर्गत निवडणुकांवरुन काँग्रेसमध्ये बैचेनी

अनेक नेते राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्याची मागणी करत आहेत. मात्र, G23 गटाचे नेते या मताशी सहमत नाहीत. | congress

सोनिया गांधी अस्वस्थ, राहुल गांधी अनिच्छुक, G23 असंतुष्ट; पक्षांतर्गत निवडणुकांवरुन काँग्रेसमध्ये बैचेनी
| Updated on: May 11, 2021 | 9:04 AM
Share

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल, हा निर्णय आता आणखी लांबणीवर पडला आहे. जून महिन्यात नवा अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत खदखद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. (Internal conflicts between congress over selection of new president)

अनेक नेते राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्याची मागणी करत आहेत. मात्र, G23 गटाचे नेते या मताशी सहमत नाहीत. योग्य पद्धतीने निवडणुका घेऊन नवा अध्यक्ष निवडावा, असे या गटाचे मत आहे. सोनिया गांधी या राहुल यांना पक्षाध्यक्षपदी बसवण्यासाठी आग्रही असल्या तरी स्वत: राहुल गांधी हे पद स्वीकारण्यासाठी फारसे इच्छूक नसल्याची सूत्रांची माहिती आहे.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाचा कारभार सांभाळत आहेत. आपल्याला अध्यक्ष म्हणून काम करताना मोकळीक मिळावी, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पण G23 गटाचे नेते सामूहिक नेतृत्त्वासाठी आग्रही आहेत. गांधी घराण्याचे समर्थक असलेल्या नेत्यांचे म्हणणे न ऐकता काँग्रेस कार्यकारिणीने लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्यावी, असे G23 गटातील नेत्यांचे म्हणणे आहे.

G23 गटाच्या प्रमुख मागण्या काय?

* काँग्रेस पक्षात सर्व स्तरावर संघटनात्मक निवडणुका व्हाव्यात. * नवा पूर्णवेळ अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष निवडावा. * प्रत्येक राज्यात स्थानिक नेत्यांना बळ देण्यात यावे. * INC TV, सोशल मीडिया वॉरियर्स अशा अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नयेत. * प्रियांका गांधी यांना मुख्य प्रचारक करावे, तर राहुल गांधी यांनी संघटनेची जबाबदारी सांभाळावी. * राज्य प्रभारी आणि महासचिवांनी आपापल्या राज्यात महिन्यातील किमान 15 दिवस उपलब्ध असावे. * मीडिया सेलची पुन्हा स्थापना करावी * प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी. स्टार प्रचारक म्हणून कोणाचीही निवड करताना त्याचे संबंधित राज्यातील स्थान, प्रभाव आणि लोकप्रियता जोखून घ्यावी.

‘बंगालमध्ये एकही जागा न मिळणं आश्चर्य’

सोनिया गांधी यांनी सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या निकालासंदर्भात भाष्य केले.या पराभवातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. असे निकाल का आले? हे जाणून घेतलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागा मिळाली नाही हे आश्चर्यजनक आहे. या धक्कादायक निकालांची दखल घेतलीच पाहिजे. या निकालांची समीक्षा करण्यासाठी छोटी छोटी टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असं त्या म्हणाल्या.

(Internal conflicts between congress over selection of new president)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.