28 फेब्रुवारीपर्यंत आंतराराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी कायम, DGCAचा निर्णय

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता 28 फेब्रुवारीपर्यंत रद्दच राहतील. तशी माहिती DGCAकडून देण्यात आली आहे.

28 फेब्रुवारीपर्यंत आंतराराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी कायम, DGCAचा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता 28 फेब्रुवारीपर्यंत रद्दच राहतील. तशी माहिती DGCAकडून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भारतातून परदेशात जाण्यासाठी अजून 1 महिना वाट पाहावी लागणार आहे. DGCAने दिलेल्या माहितीनुसार सध्या खासकरुन काही रुटवरीलच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना कॉम्पिटेंट अथॉरिटीकडून परवानगी दिली जाऊ शकते.(International flights will remain closed until February 28 )

दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण आता 28 फेब्रवारीनंतरच होण्याची शक्यता असल्यानं आंतराष्ट्रीय प्रवासी उड्डाणं आणि त्यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या उड्डाणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

काही निवडक उड्डाणेच सुरु

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण वंदे भारत मोहिमेअंतर्गत काही खास उड्डाणांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर जुलै महिन्यात निवडक देशांसोबत दोन पक्षीय एअर बबल करारानुसार विमान उड्डाणं करण्यात आली होती. भारताने अमेरिका, ब्रिटन, यूएई, भूतान आणि फ्रान्ससह 24 देशांसोबत एअर बबल करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं त्यांच्या एअरलाईन्सकडून संचलित केले जाऊ शकतात.

देशात 25 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याआधी 23 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. ही बंदी 29 मार्चपर्यंत होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याने लॉकडाऊनचा कालावधीही वाढला होता. त्यामुळे विमानांच्या उड्डाणालाही बंदी घालण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

Breaking | दिल्ली-मुंबई विमान सेवा बंद होणार?

लॉकडाऊनकाळातील बुकिंग, विमान कंपन्यांकडून प्रवाशांना कोट्यावधी रुपये रिफंड केल्याचा दावा, काय सत्य?

International flights will remain closed until February 28

Published On - 9:28 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI