दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या कपाटातून खळबळजनक गोष्टी हाती, खोली क्रमांक 22…
Delhi Red Fort Blast Update : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा बॉम्बस्फोट झाला आणि संपूर्ण देश हादरला. सुरूवातीला हा साधा स्फोट असल्याचे कळत होते. मात्र, त्यानंतर एका मागून एक हैराण करणारी माहिती पुढे आली.

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात निष्पाप लोकांचा जीव गेला. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे कळत होते. मात्र, या स्फोटाची धागेदोरे थेट जैसपर्यंत जाऊन पोहोचले. पुलवामातील रहिवासी आणि पेशाने डॉक्टर असलेल्या उमरने हा स्फोट घडवून आणला. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी उमर गाडीतच होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून या स्फोटाचे प्लॅनिंग सुरू होते. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोट करण्याचा कट नव्हता तर अयोध्या किंवा वाराणसीत मोठा स्फोट करण्याचे नियोजन होते. मात्र, गडबडीत हा स्फोट झाल्याचे तपासात कळतंय. थेट काही डॉक्टरांचा या बॉम्बस्फोटात सहभाग उघड झाला. तपास यंत्रणांकडून अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली.
दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट पुढे आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी डॉ. शाहीनच्या कपाटातून तब्बल 18 लाख रुपये रोख जप्त केली आहे. ही रोकड शाहीनच्या खोली क्रमांक 22 च्या कपाटात ठेवण्यात आली होती आणि एका बॅगमध्ये लपवण्यात आली होती. भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी मोठा पैसा जैशने भारतात पाठवला होता.
डॉक्टर शाहीन या बॉम्बस्फोटाची मास्टरमाईंट आहे. तपासात असे दिसून आले आहे की, शाहीनने 25 सप्टेंबर रोजी ब्रेझा कार खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर केला होता. शाहीनने एवढी मोठी रक्कम कशी मिळवली याचा तपास एनआयएकडून केला जात आहे. एनआयएने अल फलाहच्या प्रशासकीय ब्लॉकमधील शाहीनच्या लॉकरचीही झडती घेतली. सर्व पुरावे गोळा करण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे. अल फलाह विद्यापीठ या स्फोटाचे मुख्य कनेक्शन असल्याचे कळतंय.
शाहीनने तपास यंत्रणांच्या चाैकशीत सांगितले की, डॉ. मुझम्मिलच्या सांगण्यावरून दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील झाली. एजन्सींना हँडलर डॉ. अबू उकाशाह यांचे टेलिग्राम अकाउंट देखील सापडले आहे. 2022 मध्ये डॉ. मुझफ्फर, डॉ. उमर आणि डॉ. आदिल हे तुर्कीला गेले होते. तिथे ते काही दिवस राहिले देखील. यावेळी त्यांच्या दहशतवाद्यांसोबत काही मिनिट झाल्याचेही सांगितले जाते.
