आता बीसीसीआयमध्ये मोठ्या घडामोडींना वेग… विदेशी खेळाडूंसाठी नवीन फर्मान काय? काय घडतंय?
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे स्थगित झालेले आयपीएल 2025, दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीमुळे पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. विदेशी खेळाडूंच्या परतीचा प्रयत्न सुरू असून, 15 मेच्या आसपास सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील हल्ल्याचा इशारा मिळाल्याने 8 मे रोजी एक सामना रद्द करण्यात आला होता.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळला आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवरील गावांमधील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित केलं होतं. पण आता दोन्ही देशातील तणाव निवळल्याने बीसीसीआयमध्ये मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. बीसीसीआयने आयपीएल सामने सुरू करण्यासाठी या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याबाबतचा निर्णय आज होण्याची शक्यताही आहे. पण विदेशी खेळाडूंमुळे बीसीसीआयचं टेन्शन वाढलं असून त्यामुळेच बीसीसीआयला नवं फर्मान काढावं लागलं आहे.
लवकरात लवकर आयपीएल सामने सुरू करण्यासाठीची योजना आखली जात आहे. ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, भारत सरकारच्या परवानगीनंतर 15 मेच्या आसपास आयपीएल सामने सुरू करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण भारत-पाक युद्धस्थितीमुळे विदेशी खेळाडू आणि त्यांचा कोचिंग स्टाफ त्यांच्या मायदेशी गेला होता. त्यामुळे या खेळाडूंना परत बोलवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या विदेशी खेळाडूंना परत येण्याचं फर्मान बजावण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. वाचा: पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, संतापलेल्या पतीने… सत्य समोर येताच बसला धक्का
अन् सामना रद्द झाला
8 मे रोजी जम्मू आणि पठाणकोट येथे हवाई हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे धर्मशाळा येथील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर लीगच सस्पेंड करण्यात आली होती. त्यामुळे बहुतेक विदेशी खेळाडू आणि कोचिंग स्टाफ शुक्रवार आणि शनिवारी त्यांच्या मायदेशी निघून गेले होते. त्यामुळे आता या विदेशी खेळाडूंना परत भारतात येण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे.
कोचिंग स्टाफचा मोठा निर्णय
रिपोर्टनुसार, एका फ्रेंचायजीचा कोचिंग स्टाफ रविवार (11 मे) रोजी भारतातून मायदेशी जाणार होता. परंतु शस्त्रसंधी झाल्याने या कोचिंग स्टाफचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. परंतु, सर्व टीमसाठी आता एक मोठं टेन्शन आहे. ते म्हणजे त्यांचे विदेशी खेळाडू भारतात येणार की नाही? येत्या 25 मे रोजीच आयपीएल सामने संपुष्टात येणार होते. पण आता शेड्यूलमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता काही मोठा निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
या टीमला सर्वाधिक टेन्शन
सर्व टीमच्या तुलनेत गुजरात टायटन्सची टेन्शन अधिक वाढल्याचं सांगितलं जात आहे. गुजरातच्या टीममध्ये फक्त दोन विदेशी खेळाडू आहे. जोस बटलर आणि गेराल्ड कोएट्जी हे दोन्ही खेळाडू भारत सोडून आपल्या मायदेशी परतले आहेत. फ्रेंचायजी त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचे काही खेळाडूंनी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल 2025मध्ये एकूण 57 सामने झाले आहेत. 58 वा सामना मध्येच थांबवला गेला. या सीजनमधील अजून 16 सामने बाकी आहेत.
