पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, संतापलेल्या पतीने… सत्य समोर येताच बसला धक्का
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्या डोक्यावर दगड मारला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

छत्तीसगडच्या बलरामपूर-रामानुजगंज जिल्ह्यातील कुसमी पोलीस स्टेशन अंतर्गत चैनपूर पंचायतीच्या पहाडी कोरवा वस्तीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. हत्येमागचे कारण तिने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपीची ओळख बबुआ कोरवा (वय 25) अशी आहे. ही घटना बुधवारी रात्रीची आहे.
समोर आलोल्या माहितीनुसार, चैनपूर पंचायतीतील सरंगा जोभी पाठ येथील लालखवा कोरवा पारा येथील रहिवासी बबुआ कोरवा याचे चार वर्षांपूर्वी गावातीलच मधु कोरवा यांची मुलगी ढेली बाई यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. बुधवारी रात्री बबुआचे आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य नातेवाइकांकडे गेले होते. बबुआ दारू पिऊन रात्री घरी आला. त्याने पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु काही कारणास्तव पत्नीने नकार दिला.
पत्नीला मारहाण सुरू केली
बबुआला राग अनावर झाला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा बबुआच्या सासऱ्या मधु यांना कळले की त्यांचा जावई त्यांच्या मुलीला मारहाण करत आहे, तेव्हा मधु आपल्या धाकट्या भावासह साधो यांच्यासह मुलीच्या सासरी पोहोचले. यानंतर बबुआ आपल्या सासरे आणि त्यांच्या धाकट्या भावाशीच भांडला. यावर मधु आणि साधो यांनी जावयाला मारहाण केली आणि त्याला भांडण न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या रात्री दोघेही आपल्या घरी परतले.
पत्नीच्या डोक्यावर दगड मारला
जेव्हा बबुआचे सासरे आणि त्यांचा धाकटा भाऊ त्याच्या घरी गेले, तेव्हा तो आपल्या पत्नीवर आणखी संतापला. त्याने पत्नीला सांगितले की तू मला मार खायला लावला. इतकेच नाही तर त्याने पुन्हा पत्नीला मारहाण केली आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तो राक्षस बनला. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली आणि दगड उचलून तिच्या डोक्यावर टाकला, ज्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिला
पत्नीची हत्या केल्यानंतर बबुआने तिचा मृतदेह गुंडाळला आणि रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिला. या घटनेची माहिती गुरुवारी सकाळी शेजाऱ्यांना समजली. त्यांनी गावच्या कोटवाराला याबाबत माहिती दिली. कोटवाराने पोलिसांना ही माहिती कळवली. माहिती मिळताच कुसमी पोलीस स्टेशनचे प्रभारी ललित यादव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी बबुआ कोरवा याला अटक केली.
