AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC : रेल्वे प्रवासात सावधान, या १४ वेबसाईटवरुन जेवण मागवू नका, ऑर्डर करण्याआधी पाहा यादी

भारतीय रेल्वेच्या खानपान सेवा पुरवणाऱ्या आयआरसीटीसीने प्रवाशांना प्रवासात फूड ऑर्डर करताना सावधान राहायला सांगितलेले आहे. रेल्वेने १४ अनधिकृत ऑनलाईन फूड पुरवणाऱ्या कंपन्यांवर बंदी घातली आहे.

IRCTC : रेल्वे प्रवासात सावधान, या १४ वेबसाईटवरुन जेवण मागवू नका, ऑर्डर करण्याआधी पाहा यादी
indian railway and irctc
| Updated on: Jun 12, 2026 | 9:40 PM
Share

रेल्वे ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबद्दल नेहमीच प्रश्न केले जातात. त्यामुळे रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने ( IRCTC ) आता अधिकृत प्लॅटफॉर्म्सद्वारे जेवण बुक करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेने ई-कॅटरिंग सेवेचा आवाका वाढवण्याबरोबरच अनेक खाजगी प्लॅटफॉर्मना देखील या व्यवसायात उतरवले आहे. मात्र, कंपनीने प्रवाशांना सावध करीत सर्वच कंपन्या अधिकृत नसल्याचे म्हटले आहे.

आयआरसीटीसीच्या मते काही प्लॅटफॉर्म विना परवानगी ई-कॅटरिंग सेवा देत होते. आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करत नव्हते. यामुळे प्रवाशांना निकृष्ठ अन्न मिळाल्यावर, बिला संदर्भात वाद आणि पैशांचा वाद तसेच डेटा सुरक्षेसारख्या समस्यांचा करावा लागू शकतो. त्यामुळे आयआरसीटीसीने याबाबतीत कठोर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

IRCTC ने १८ फेब्रुवारी २०२६ मध्ये सर्वात आधी कायदेशीर नोटिस जारी केली होती. त्यानंतर १६ मार्च आणि ११ एप्रिल २०२६ रोजी अनेक अनधिकृत फूड डिलिव्हरी ऑपरेटरांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. विशेष तपासणी मोहिमेत अनेक प्लॅटफॉर्म्सचा थांगपत्ता लागला जे रेल्वेच्या परवानगी शिवाय ई-कॅटरींगची सेवा पुरवत होते. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात त्यांच्यावर आता रितसर कारवाई सुरु केली आहे.

IRCTC ने कारवाई करताना रेलरेस्ट्रो (RailRestro), रेलमित्र ( RailMitra ), ट्रॅव्हलखाना ( TravelKhana ), ट्रेन्सकॅफे ( TrainsCafe ), डीआयबी रेल ( DIBRail ), रेलफूड ( RailFood ), कमेससम ( ComesSum ), ट्रॅव्हलर फूड ( TravelerFood ), फूड ऑन ट्रॅक डॉट इन ( FoodOnTrack.in ), ई कॅटरिंग ऐप ( eCatering App ), खाना ऑनलाईन ( KhanaOnline ), ट्रेनवे ( TrainWay ), रेलमील ( RailMeal ) आणि ट्रेनमेन्यू ( TrainMenu ) सारख्या प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे.

प्रवाशांना काय सल्ला ?

आयआरसीटीसीने प्रवाशांना आवाहन केले आहे की केवळ अधिकृत ई-कॅटरिंग वेबसाईट, फूड ऑन ट्रॅक (Food on Track) मोबाईल ऐप वा रेल्वे द्वारा अधिकृत फूड पार्टनर्सद्वारे जेवणाची ऑर्डर करावी. यामुळे फूड हायझीन, सुरक्षित पेमेंट, योग्य बिल आणि ग्राहक मदत सारख्या सुविधा मिळू शकतील.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड